लग्नाचे वचन देऊन ठेवले अनैतिक संबंध; लेफ्टनंट कर्नलची आत्महत्या, ब्रिगेडियरवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 08:33 AM2021-10-18T08:33:14+5:302021-10-18T08:33:33+5:30

पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेशी अनैतिक संबंध ठेवले. नंतर अश्लील फोटो व व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Case filed against Brigadier rank officer for driving woman colleague to suicide in Pune | लग्नाचे वचन देऊन ठेवले अनैतिक संबंध; लेफ्टनंट कर्नलची आत्महत्या, ब्रिगेडियरवर गुन्हा दाखल

लग्नाचे वचन देऊन ठेवले अनैतिक संबंध; लेफ्टनंट कर्नलची आत्महत्या, ब्रिगेडियरवर गुन्हा दाखल

Next

पुणे : पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेशी अनैतिक संबंध ठेवले. नंतर अश्लील फोटो व व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याने महिलेने आत्महत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी महिलेचे वरिष्ठ लष्करी अधिकारी बिग्रेडियर अजित मिलू (सध्या रा. बिग्रेडियर जनरल स्टाफ, हेड क्वॉटर्स, आर्मी ट्रेनिंग कमांड, सिमला, हिमाचल प्रदेश) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 

आत्महत्येची घटना वानवडीतील ऑफिसर मेसमध्ये १३ ऑक्टोबर रोजी घडली होती. हा प्रकार २०१९ पासून १२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला होता. लेफ्टनंट कर्नल असलेल्या ४२ वर्षांच्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांचे पती जयपूर येथे लष्करी सेवेत असून, या घटनेनंतर ते पुण्यात आल्यावर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

काही महिन्यांपासून प्रशिक्षणासाठी त्या सिमल्याहून पुण्यात आल्या होत्या. बिग्रेडियर मिलू यांच्या धमक्यांना घाबरून त्यांनी १३ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. वानवडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली होती. आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मिलूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचे वचन देऊन ठेवले अनैतिक संबंध
लेफ्टनंट कर्नल असलेली ही महिला सिमला येथे कार्यरत होती. या काळात २०१९ पासून त्यांचे वरिष्ठ अधिकारी बिग्रेडियर अजित मिलू यांनी गैरफायदा घेऊन त्यांच्याशी प्रेमाचे नाटक केले. लग्नाचे वचन देऊन त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवले. त्यांचे अश्लील फोटो व व्हिडिओ बनवून ते व्हायरल करून या महिलेला ते बदनामी करण्याची धमकी देत असत.

Web Title: Case filed against Brigadier rank officer for driving woman colleague to suicide in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.