पोलीस प्रशिक्षक पती व दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:10 AM2021-02-10T04:10:44+5:302021-02-10T04:10:44+5:30
पती सोमनाथ गंगाराम शिंदे व दीर सतीश गंगाराम शिंदे (दोघे सध्या रा. खंडाळा, ता मावळ, जि. पुणे, मूळ रा. ...
पती सोमनाथ गंगाराम शिंदे व दीर सतीश गंगाराम शिंदे (दोघे सध्या रा. खंडाळा, ता मावळ, जि. पुणे, मूळ रा. भांडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका व सोमनाथ शिंदे यांचा विवाह १५ मे २०१४ रोजी झाला आहे. लग्नानंतर प्रियंका सासरी भानगाव येथे गेल्या असता २२ ऑक्टोबर २०१४ रोजी पतीने त्यांचे भावास कामाला लावण्यासाठी तुझ्या माहेरून दोन लाख रूपये घेऊन ये असे सांगितल्याने, तिने विरोध केला असता पतीने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. पैसे न दिल्याचा राग मनात धरून तेव्हापासून पती सोमनाथ हा नेहमी दारू पिऊन यायचा व वेळोवेळी घरातून बाहेर काढून व मारहाण करायचा. दौंड एसआरपी ग्रुप नंबर ७ मध्ये आले असता १४ एप्रिल २०१७ रोजी पती व दिराने तिला मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. त्यावेळी दुकान टाकण्यासाठी दोन लाख रूपये आईवडिलांकडून घेऊन येण्यासाठी मारहाण केली होती. त्या वेळीही तिने दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आई वडिलांनी शक्य तेवढे पैसे पाठवून दिले होते. त्यानंतर सन २०२० मध्ये खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे पतीची प्रशिक्षक म्हणून बदली झाल्याने तेथे राहण्यास गेले असताना पतीने दारू पिऊन अनेक वेळा मारहाण करून घराचे बाहेर काढून शिवीगाळ दमदाटी केली होती. त्याबाबत तिने प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांनाही तक्रार केली होती. त्यामुळे राखीव पोलीस निरीक्षक लाड यांनी भांडण मिटवून पतीकडून पुन्हा त्रास देणार नाही व मारहाण करणार नसल्याचा जबाब लिहून घेतला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी मारहाण सुरुच ठेवली होती. त्या ८ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पती सोमनाथ याने तिचे दीर सतीश शिंदे याच्या सांगण्यावरून बेदम मारहाण केली व माहेरून दोन लाख रूपये घेऊन ये नाहीतर घर सोडून निघून जा, अशी धमकी दिली. गळ्यातील दागिने काढून घेतले. त्यामुळे अखेर प्रियंका हिने आईवडिलांना बोलावून घेऊन घडलेली पतीबद्दल तक्रार केली व आईवडिलांच्या घरी जाऊन लोणी काळभोर येथे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
--