शिक्रापूर पोलीस ठाण्यात तब्बल सोळा जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:11 AM2021-01-22T04:11:50+5:302021-01-22T04:11:50+5:30
तळेगाव ढमढेरेसह (ता. शिरूर) दहिवडी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष करू नये, फटाके वाजवू नये, गुलाल उडवू नये असे ...
तळेगाव ढमढेरेसह (ता. शिरूर) दहिवडी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष करू नये, फटाके वाजवू नये, गुलाल उडवू नये असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले असताना शिक्रापूर पोलिसांनी अनेक उमेदवारांना त्याबाबत लेखी नोटीस देऊन असे कृत्य करू नये असे सांगितलेले होते तसेच शिक्रापूर पोलिसांनी प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला असताना देखील तळेगाव ढमढेरे व दहिवडी येथे काही विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी कर मधून जल्लोष करत काहींनी फटाके वाजविण्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत पोलीस नाईक अमोल ज्ञानदेव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी अमन जावेद बागवान, मोहित संतोष गुंदेचा, बुराहान जावेद बागवान, साहिल सादिक बागवान, राज सलीम बागवान सर्व रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे यांच्या विरुद्ध तसेच पोलीस शिपाई कृष्णा सूर्यभान व्यवहारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी शरद परशुराम जाधव, प्रदीप कुमार बाळासाहेब ढमढेरे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे यांच्या विरुद्ध आणि पोलीस नाईक किशोर बसय्या तेलंग यांची दिलेल्या फिर्यादीवरून बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल शिवाजी भुजबळ, अंकिता भरत भुजबळ, संपत सिताराम भुजबळ रा. माळवाडी तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे तसेच वाल्मिक चंद्रकांत सातकर, राजेंद्र रामदास ढमढेरे, विजय दादासाहेब ढमढेरे, दिलीप विठ्ठल ढमढेरे, विलास आण्णासाहेब ढमढेरे, संजय दादासाहेब ढमढेरे रा. दहीवडी ता. शिरूर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी व पोलीस नाईक अमोल चव्हाण हे करत आहेत.