नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्याविरुद्ध मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 09:19 PM2018-03-04T21:19:41+5:302018-03-04T22:31:20+5:30
पुणे : पूर्वीच्या वादातून बांबूने दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ ही घटना सातारा रोडवरील शंकर महाराज मठासमोर शनिवारी रात्री नऊ वाजता घडली़.
पुणे : पूर्वीच्या वादातून बांबूने दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. ही घटना सातारा रोडवरील शंकर महाराज मठासमोर शनिवारी रात्री नऊ वाजता घडली़.
राजेंद्र शिळीमकर, अनंत तंवर, गिरीश क्षीरसागर, निलेश देगावकर (सर्व रा़ धनकवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी शैलेंद्र प्रभाकर दीक्षित (वय ४७, रा़ पुण्याईनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. दीक्षित यांच्याविरुद्ध अनूसुचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे़.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र दीक्षित हे शनिवारी रात्री शंकर महाराज मठासमोर आले असताना जुन्या वादाचा राग मनात धरुन आरोपींनी बांबूने, दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले़. दीक्षित यांच्या फिर्यादीवरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
दीक्षित यांच्याविरुद्ध आनंद आत्माराम तौर (वय २०, रा़ शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे़. शैलेंद्र दीक्षित यांनी शंकर महाराज मठासमोरील २० रुपयात पोटभर जेवण या स्टॉलमधील कामगारांना शिवीगाळ केल्याने आनंद तौर यांनी शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता त्यांना हाताने मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली, अशी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. सहायक पोलीस निरीक्षक व्ही़ बी़ कोळी अधिक तपास करीत आहेत़.