दौंडला गोवंश जनावरे कत्तलीसाठी बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:09 AM2021-03-30T04:09:50+5:302021-03-30T04:09:50+5:30
-- दौंड : दौंड येथील खाटीक गल्ली परिसरातील २६ गोवंश जनावरे कत्तल करण्याच्या ऊद्देशाने बाळगल्या प्रकरणी आबीद कुरेशी ...
--
दौंड : दौंड येथील खाटीक गल्ली परिसरातील २६ गोवंश जनावरे कत्तल करण्याच्या ऊद्देशाने बाळगल्या प्रकरणी आबीद कुरेशी , आसीफ कुरेशी , वाजीद कुरेशी (तीघे राहणार खाटीक गल्ली दौंड ) यांच्यावर गून्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती पोलीस निरिक्षक नारायण पवार यांनी दिली.
दरम्यान सदरची जनावरे आणि वाहतूक करणारे तीन टेम्पो पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. खाटीक गल्लीत गोवंश जनावरे कत्तलसाठी बाळगले असल्याची माहीती पोलीसांना मिळाली होती त्यानुसार रात्रीच्या सुमारास पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली आहे याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक ऋषीकेश अधिकारी अधिक तपास करीत आहे. तसेच दुसऱ्या अन्य एका घटनेत लिंगाळी ( ता. दौंड ) परिसरातील कॅनाल रोड जवळ असलेल्या पञ्याच्या शेड मध्ये १६ गोवंश कत्तल करण्याच्या ऊद्देशाने बाळगल्या प्रकरणी अहमद कुरेशी ( रा. कुंभारगल्ली , दौंड ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे परिणामी गोवंश वाहतुक करणारी पीकअप गाडी आणि गोवंश पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी पोलीस सब इन्सपेक्टर सुशील लोंढे तपास करीत आहे.
--
कोट १
पोलीस पथक तैनात
---
दौंड शहर आणि परिसरात गोवंश कत्तलीसाठी बाळगण्याचे प्रकार गंभीर असल्याचे एकुण परिस्थितीनुसार निदर्शनास आले आहे. तेव्हा गोवंश कत्तलीसाठी बाळगले तर कडक कारवाई यापूर्वी करण्यात आल्या आहे आणि भविष्यात केली जाईल तसेच गोवंश कत्तली रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे
- नारायण पवार
( पोलीस निरिक्षक )