लाल महालात व्हिडीओ रिल्स करणाऱ्या वैष्णवी पाटीलविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 11:45 AM2022-05-21T11:45:51+5:302022-05-21T13:36:20+5:30

मराठी कलाकार वैष्णवी पाटीलसोबत इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल...

case has been registered against marathi actress Vaishnavi Patil for reels videos in Lal Mahal | लाल महालात व्हिडीओ रिल्स करणाऱ्या वैष्णवी पाटीलविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

लाल महालात व्हिडीओ रिल्स करणाऱ्या वैष्णवी पाटीलविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : पुण्यातील लाल महालामध्ये लावणीची रिल्स केल्यामुळे शिवप्रेमींनी मोठा संताप व्यक्त केला होता. या प्रकरणी आता फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मराठी कलाकार वैष्णवी पाटीलसोबत इतर तीन जणांविरोधात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी राकेश विनोद सोनवणे यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी लाल महालात आरोपी वैष्णवी पाटील व तीच्या सोबत असलेली एक स्त्री व दोन पुरुष असे लाल महाल येथे येऊन लाल महालाच्या आतील मोकळ्या जागेत वैष्णवी पाटील हिने लावणी नृत्य केले. तिच्यासोबत असलेल्या पुरुषांपैकी दोन पुरुषांनी त्याचे मोबाईलमध्ये शुटींग करून त्याचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केला.

यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी यावर आक्षेप घेतला होता. या प्रकरणात लाल महालाचे रखवालदार सोनवणे यांनी फिर्याद दिली. यावर बोलताना सोनवणे म्हणाले, मी त्यांना लावणी नृत्य व त्याचे शुटींग करण्यापासून रोखले होते. पण त्यांनी ते ऐकले नाही.

वैष्णवी पाटीलने मागितली माफी-

या सगळ्या प्रकरणावर वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. या व्हिडिओमध्ये माफी मागत वैष्णवीने म्हणाली, 'पुण्याच्या लाल महालात व्हिडीओ शूट करताना माझ्या मनात कोणतेही वाईट विचार नव्हते. गाणं सुंदर असल्याने त्यावर व्हिडीओ करावा असे माझ्या मनात आले. त्यामुळे मी त्यावर मी व्हिडीओ शूट केला. लाल महालात मी व्हिडीओ शूट केला ही माझ्याकडून चूक झाली आणि ती चूक मी मान्य करते. जितकेही शिवप्रेमी आहेत, जी जनता माझ्यावर प्रेम करते, माझ्या नृत्यावर प्रेम करते त्या सर्वांची मी माफी मागतें.' असा व्हिडीओ वैष्णवीने पोस्ट करत माफी मागितली आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगरपालिकेने लाल महाल पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. हजारो पर्यटक लाल महालला भेट देण्यासाठी येत असतात. लाल महाल बंद असतानाही दुसरीकडे याच लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर आधारीत रिल्सचे शुटिंगचे करण्यात आल्याचं समोर आलं होतं. 

Read in English

Web Title: case has been registered against marathi actress Vaishnavi Patil for reels videos in Lal Mahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.