Murlidhar Mohol | माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 10:09 AM2023-03-27T10:09:53+5:302023-03-27T10:16:32+5:30

कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल...

case has been registered against two people who demanded extortion in the name of former mayor Muralidhar Mohol | Murlidhar Mohol | माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

Murlidhar Mohol | माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

-विवेक भुसे/ किरण शिंदे

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप पिरगोंडा पाटील, शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर चाळ, कर्वे रस्ता) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. एका बांधकाम व्यवसायिकाने याप्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी विरुद्ध खंडणी, धमकावणे, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पौड रस्त्यावर या बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. दोन दिवसांपूर्वी आरोपी संदीप पाटील आणि शेखर ताकवणे यांनी संबंधित बांधकाम व्यवसायिकाच्या मोबाईलवर संपर्क साधला. मुरलीधर मोहोळ यांच्या मावस भावाच्या नावाचा वापर करुन खंडणी मागितली. भारतीय जनता पक्षाच्या युवा माेर्चाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तीन कोटी रुपये हवे आहेत. पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहचवू, अशी धमकी आरोपी पाटील आणि ताकवणे यांनी दिली.

आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला. बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडे तपास करत आहेत.

Web Title: case has been registered against two people who demanded extortion in the name of former mayor Muralidhar Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.