Pune: अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहत अश्लील हावभाव, विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Updated: December 27, 2023 14:09 IST2023-12-27T14:07:59+5:302023-12-27T14:09:48+5:30
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे....

Pune: अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहत अश्लील हावभाव, विनयभंगाप्रकरणी गुन्हा दाखल
पुणे : अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग केल्याची घटना कोंढवा येथे घडली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. २६) सायंकाळी पाच ते सव्वापाच आणि यापूर्वी वेळोवेळी एनआयबीएम रोडवरील एका बिल्डिंगच्या समोरील मोकळ्या जागेत घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका महिलेने मंगळवारी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सिद्धांत विजय जाधव (रा. ६०४, पंचशिल हाईट्स, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एनआयबीएम रोड वरील एका बिल्डिंगमध्ये राहते. आरोपी सिद्धांत जाधव हा मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास महिलेच्या फ्लॅटच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत आला. त्याने अंगावरील सर्व कपडे काढून महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करुन महिलेच्या स्त्री मनास लज्जा उत्पन होईल असे कृत्य केले. आरोपीने यापूर्वी देखील अशा प्रकारे गैरवर्तन केल्याचे फिर्यादी महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे करत आहेत.