अतिवृष्टी झाली तर या १७ गावांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:53+5:302021-07-29T04:10:53+5:30

(स्टार ९७४ डमी) पुणे : अतिवृष्टी झाल्यास जिल्ह्यातील काही तालुक्यातील ठरविक पर्यटनस्थळ आणि १७ दरडप्रवण गावांना धोका निर्माण होऊ ...

In case of heavy rains, these 17 villages are in danger | अतिवृष्टी झाली तर या १७ गावांना धोका

अतिवृष्टी झाली तर या १७ गावांना धोका

Next

(स्टार ९७४ डमी)

पुणे : अतिवृष्टी झाल्यास जिल्ह्यातील काही तालुक्यातील ठरविक पर्यटनस्थळ आणि १७ दरडप्रवण गावांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पर्यटकांना अशा ठिकाणी जाताना काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच मावळ, मुळशी, भोर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर तालुक्यांतील १७ गावे दरडप्रवण म्हणून शासनाने घोषित केली आहेत. अतिवृष्टी झाल्यास या गावांना धोका निर्माण होऊ शकतो.

माळीण गावाच्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने राज्यातील धोकादायक किंवा दरडप्रवण गावांची यादी जाहीर केली आहे. तसेच या गावांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, या गावातील लोक गाव सोडायला तयार नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न देखील अद्यापही प्रलंबित आहे.

-----

* जिल्ह्यातील दरडप्रवण धोकादायक असलेली गावे

मावळ तालुक्यातील भुशी, बोरज, ताजे, गबालेवाडी, मोरमारेवाडी, माऊ, तुंग, मालेवाडी आणि लोहगड, तर भोर तालुक्यातील कोर्ले-जांभुळवाडी, पांगारी-सोनारवाडी, धानवली आणि हेडेन, आंबेगाव तालुक्यातील पसारवाडी, मुळशी तालुक्यातील घुटके, खेड तालुक्यातील भोमाळे आणि जुन्नर तालुक्यातील तळमाची वाडी

-----

* जिल्ह्यातील पुराचे पाणी साचणारी ठिकाणे

पुणे जिल्ह्यात देहु, आळंदी, राजगुरूनगर, शेलपिंपळगाव, डोंगरगाव, पिंपरी सांडस, मांजरी, थेऊर, शिरूर आदी गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यास पुराचे पाणी आतमध्ये शिरू शकते. त्यामुळे या गावातील अतिक्रमणे काढून नदीच्या पाण्याचा प्रवाह मोकळा करणे गरजेचे आहे. अन्यथा पूरपरिस्थिती आणखि धोकादायक बनू शकते.

-----

* पाणी साचण्याची कारणे

या नदीकाठच्या गावांमध्ये मुख्यत: अतिक्रमण हा मुख्य मुद्दा आहे. अतिक्रमणामुळे पाण्याचा प्रवाहाला अडथळा निमार्ण होत आहे. तसेच भीमा, भामा, इंद्रायणी, पवना, घोडनदी, मुळा, मुठा या नद्यांवर उभारलेल्या पुलांची उंची मयार्दित असल्यामुळे पुराच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होत आहे. पुराचे पाणी वेगाने जात नाही. त्यामुळे हे पाणी आजुबाजूच्या गावांमध्ये पाणी शिरत आहे.

-----

* पाऊस नको नको सा !

१) आमचे गाव दरडप्रवण म्हणून घोषीत केले आहे. त्यामुळे दरवषी पावसाळ्यात आम्हाला भितीच्या छायेखालीच राहावे लागत आहे. अतिवृष्टी झाल्यास आमच्या गावाला धोका आहे. भविष्यात धोकादायक घटना होऊ नये यासाठी शासनाने गावांचा पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

- एक नागरिक, मोरमारेवाडी

Web Title: In case of heavy rains, these 17 villages are in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.