सिंहगडावरील विदेशी पर्यटकासोबत गैरवर्तन करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 21:33 IST2025-04-12T21:31:59+5:302025-04-12T21:33:11+5:30
व्हिडीओमधील चार तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सिंहगडावरील विदेशी पर्यटकासोबत गैरवर्तन करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, धायरी: किल्ले सिंहगडावर न्यूझीलंडवरून आलेल्या पर्यटकाबरोबर काही तरुणांनी गैरव्यवहार केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाला. त्यावरून हवेली पोलिस ठाण्यामध्ये पोलिस हवालदार संतोष भापकर यांनी चौघांविरुध्द फिर्याद दिली. त्यानुसार व्हिडीओमधील चार तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांन दिलेले माहीत अशी की, ३ एप्रील रोजी न्यूझीलंड येथील एक पर्यटक सिंहगडावर ट्रेकसाठी गेला होता. त्यावेळी संभाजीनगर येथील आठ ते दहा तरुणांचा ग्रूपही ट्रेक करत होता. ट्रकेदरम्यान दत्तात्रल नाईलकर यांचा लिंबू सरबतचे स्टॉल आहे तेथे हे तरुण थांबले होते. त्यातील चार तरुणांनी न्यूझिलंडच्या पर्यटकांशी गप्पा मारल्या व त्याला मराठी येत नसल्याचे समजल्यावर त्याला मराठीतील गलिच्छ व अश्लिल शिव्या म्हणायला लावल्या. मराठी भाषा अजिबात माहित नसल्याने परदेशी पर्यटकाने त्या शिव्या म्हटल्या. या साऱ्या घटनेचा व्हीडीओ व्हाट्सअप आणि फेसबुक पेजवर व्हायरल झाला. त्यामुळे गडकिल्ले प्रेमी, शिवप्रेमींनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. पुण्यातील विविध पोलिस ठाण्यात त्यातरुणांवर कारवाई करण्याबाबत निवेदन दिले गेले.
हवेली पोलिस ठाण्यात शिवसेनेकडून निवेदन
हवेली पोलिस ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच मनसे खडकवासला मतदार संघातर्फे हवेली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी इतिहास संशोधक डॉ. नंदकिशोर मते, शिवसेना(उबाठा) विधानसभा प्रमुख नितीन वाघ, विभागप्रमुख महेश पोकळे, संघटक तानाजी गाढवे, केतन शिंदे, महेश विटे, कल्पेश वाजे,आकाश कुमावत, सिंहगड ट्रेकरचे किरण पाटील, ऍड. प्रकाश केदारी, आशिष पराते, रोहित वेद,तसेच मनसे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष विजय मते, चंदन कड, राहुल वाळुंजकर, बाळासाहेब हणमगर, बाळासाहेब मंडलिक, अंगराज पिसे, आकाश साळुंके आदी उपस्थित होते.