अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:10 AM2021-01-25T04:10:42+5:302021-01-25T04:10:42+5:30
बारामतीत एकावर गुन्हा दाखल बारामती : नगरपरीषदेने अनधिकृत बांधकाम करणाºयांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे.या प्रकरणी ...
बारामतीत एकावर गुन्हा दाखल
बारामती :
नगरपरीषदेने अनधिकृत बांधकाम करणाºयांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे.या प्रकरणी नगरपरीषदेने थेट पोलीस ठाणे गाठत शहर पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणारांना चांगलाच चाप बसणार आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी पालिकेचे सहाय्यक नगररचनाकार रोहित राजेंद्र पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सम्राट रमेश शहा (रा. महावीर पथ, बारामती) यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहा यांच्या विरोधात पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ ते कलम ५२ व ५४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. नोटीस देऊन देखील बांधकाम न काढल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रचनाकार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहा यांना बारामती पालिकेने सुधारित बांधकाम परवान्याच्या अन्वये ८ नोव्हेंबर २०११ रोजी परवानगी दिली होती. परंतु बांधकामधारक शहा हे मंजूरी व्यतिरिक्त वाढीव बांधकाम करत असल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेने त्यांना २८ आॅगस्ट २०२० रोजी नोटीस बजावली. यामध्ये मंजूर बांधकामाव्यतिरिक्त केलेले वाढीव बांधकाम काढून टाकावे, अशी सूचना करण्यात आली होती. परंतु निर्धारित मुददीत शहा यांनी कोणताही सुधारित प्रस्ताव नगरपालिकेकडे दाखल केला नाही. तसेच केलेले अनधिकृत बांधकाम काढून घेतले नाही.
दि. ९ आॅक्टोबर २०२० रोजी पालिकेचे क्षेत्रीय अधिकारी देवीदास साळुंखे व रचना सहाय्यक अक्षय तोरस्कर यांनी बांधकामाच्या ठिकाणी जावून स्थळ पाहणी केली. त्यावेळी मंजूरीपेक्षा वाढीव बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पुन्हा १६ आॅक्टोबर २०२० रोजी वाढीव बांधकाम काढावे, अशी नोटीस पालिकेकडून देण्यात आल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.