महिलेच्या मारहाण प्रकरणी एकास 2 वर्ष सक्तमजुरी
By admin | Published: December 9, 2014 11:31 PM2014-12-09T23:31:58+5:302014-12-09T23:31:58+5:30
महिलेस व तिच्या आई वडिलांना मारहाण केल्या प्रकरणी एका आरोपीस दोन वर्ष सक्तमजुरी तर इतर तिघांना 6 महिने साध्या कै देची शिक्षा ठोठावण्यात आली.
Next
बारामती : झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणावरून सांगवी (ता. बारामती) येथील महिलेस व तिच्या आई वडिलांना मारहाण केल्या प्रकरणी एका आरोपीस दोन वर्ष सक्तमजुरी तर इतर तिघांना 6 महिने साध्या कै देची शिक्षा ठोठावण्यात आली. आरोपींना केलेल्या दंडाची रक्कम फिर्यादी महिला व तिच्या कुटुंबियांना देण्याचे आदेश प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस. पी. शिंदे यांनी दिली.
या प्रकरणी 25 सप्टेंबर 2क्11 रोजी सुरेखा सदाशिव तावरे या महिलेने फिर्याद दिली होती. या खटल्यातील आरोपी शरद पांडुरंग तावरे, पांडुरंग नारायण तावरे, ललिता शरद तावरे, चित्र पांडुरंग तावरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घराशेजारी बाभळीच्या झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणावरून वाद झाला होता.
सुरेखा हिच्यासह तिची आई द्वारकाबाई, वडील सदाशिव तावरे यांना काठी, लोखंडी गज, कु:हाडीने मारहाण करून हात फॅ क्चर केला होता. तसेच, पाठीत आणि डोक्यात गंभीर दुखापत केली होती. त्यानुसार बारामती ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार शिवाजी होले यांनी दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले. या खटल्यात फिर्यादी, प्रत्यक्ष साक्षीदार, वैद्यकीय अधिका:यांसह तपासी पोलीस अधिका:यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी शिंदे यांनी शरद पांडुरंग तावरे यास दोन वर्ष सक्तमजुरी, 2 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. तर पांडुरंग तावरे, ललिता तावरे, चित्र तावरे यांना 6 महिने साधी कैद, 1 हजार रुपये प्रत्येकी दंड, अशी शिक्षा ठोठावण्यात आली. तर दुखापत केल्या बद्दल भारतीय दंड विधान कलम 324 नुसार शरद तावरे यास 6 महिने व इतरांना 3 महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.