फसवणूकप्रकरणी पतसंस्थेविरुद्ध गुन्हा
By admin | Published: March 21, 2017 05:27 AM2017-03-21T05:27:21+5:302017-03-21T05:27:21+5:30
आकर्षक परताव्याची जाहिरात करून गुंतवणूक करण्यास भाग पाडत परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी
पुणे : आकर्षक परताव्याची जाहिरात करून गुंतवणूक करण्यास भाग पाडत परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पतसंस्थेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चेअरमनला अटक केली आहे.
चेअरमन देविदास दत्तात्रय लोणकर (रा. भाग्योदयनगर, कोंढवा) यांना अटक करण्यात आली आहे. व्हाईस चेअरमन संदीप दत्तात्रय लोणकर, संचालक प्रवीण विठ्ठल लोणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अरुणा आल्हाट (वय ५४, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींनी संगनमताने भाग्योदय नागरी पतसंस्था सुरू केली होती. पतसंस्थेमध्ये आकर्षक व्याजदर देण्याऱ्या योजनेचा वर्षाव अशी जाहिरात २०१३ मध्ये केली. या जाहिरातीच्या अनुषंगाने त्यांनी ६ नोव्हेंबर २०१३ रोजी एक लाख
रुपये, तर ११ एप्रिल २०१४ रोजी ३ लाख ७ हजार रुपयांची ठेव ठेवली होती.
या दोन्ही ठेवींवरील ३० हजार २६२ रुपयांचे व्याज आणि मुद्दल अशी एकूण ४ लाख ३७ हजार २६२ हजार रुपयांची रक्कम मुदत पूर्ण झाल्यावर देणे अपेक्षित होते. मात्र, आरोपींनी ठेवीची रक्कम परत देण्यामध्ये टाळाटाळ केली. तसेच पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक एस. जी. लोखंडे करीत आहेत. (प्रतिनिधी)