पुरंदर उपसा जलसिंचन योजना कॅशलेस करा

By admin | Published: January 25, 2017 11:56 PM2017-01-25T23:56:12+5:302017-01-25T23:56:12+5:30

पुरंदर उपसा जलसिंचन योजना वरदान ठरण्याऐवजी भ्रष्टाचारामुळे शाप ठरू लागली आहे. शाखा अभियंता साहेबराव भोसले या

Cash Flow of Purandar Upasabha Irrigation Scheme | पुरंदर उपसा जलसिंचन योजना कॅशलेस करा

पुरंदर उपसा जलसिंचन योजना कॅशलेस करा

Next

राजेवाडी : पुरंदर उपसा जलसिंचन योजना वरदान ठरण्याऐवजी भ्रष्टाचारामुळे शाप ठरू लागली आहे. शाखा अभियंता साहेबराव भोसले या भ्रष्ट अधिकाऱ्याची तातडीने बदली करून चौकशी करण्याची मागणी आंबळे येथील शेतकऱ्यांनी केली आहे. ही योजना पारदर्शक करण्यासाठी कॅशलेस करण्यासाठी आंबळे येथील बेंदवस्ती मुंबईवस्ती येथील शेतकरी येत्या ३0 तारखेपासून उपोषण सुरु करणार आहेत .
पाण्याचे पैसे रोख स्वीकारू नये, चेकने किंवा डीडीने पैसे स्वीकारावेत, पुरंदर उपसा योजनेच्या पाण्याचे नियोजन करा, वेळापत्रक जाहीर करा, पाणी पूर्ण क्षमतेने सोडा, साखळी पद्धतीने सर्व तलाव भरा, बेंदवस्ती तलाव, शिंदेमळा तलावात पाणी सोडा, तलावाचे शासकीय मोजमापानुसार व मुरणाऱ्या पाण्याचेच पैसे घ्या, यासारख्या प्रमुख मागण्या चार दिवसांत मान्य न झाल्यास उपोषण करण्यात येणार आहे.
पुरंदर उपसा योजनेचे शाखा अभियंता साहेबराव भोसले हे मनमानी करून रोख पैसे स्वीकारत आहेत. पैशाची पावती देत नाहीत, शिवाय शेतकऱ्यांशी अरेरावी करत हुज्जत घालतात.
त्यामुळे भोसले यांची तक्रार व उपोषण करण्याबाबत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पालकमंत्री गिरीश बापट, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, कार्यकारी अभियंता संजय लोंढे, उपविभागीय अभियंता पाटील, तहसीलदार सचिन गिरी, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांना लेखी निवेदन दिले असल्याचे उपसरपंच सुभाष जगताप, शेतकरी विलास जगताप, वामन जगताप, सुरेश जगताप, अशोक जगताप यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Cash Flow of Purandar Upasabha Irrigation Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.