नेत्यांसाठी पासधारकांची गळचेपी
By admin | Published: May 5, 2015 03:09 AM2015-05-05T03:09:42+5:302015-05-05T03:09:42+5:30
तरण तलावात पोहण्याची ऐन उन्हाळ्याच्या हंगामात महिलांसाठी सकाळची बॅच राखीव केली आहे. त्यास अल्प प्रतिसाद मिळत असूनही काही राजकीय नेत्यांच्या
मिलिंद कांबळे, पिंपरी
तरण तलावात पोहण्याची ऐन उन्हाळ्याच्या हंगामात महिलांसाठी सकाळची बॅच राखीव केली आहे. त्यास अल्प प्रतिसाद मिळत असूनही काही राजकीय नेत्यांच्या आग्रहामुळे ऐन हंगामात या बॅच सुरू ठेवल्या आहेत. यामुळे पासधारकांची मोठी गैरसोय होत असून, महापालिकेचे आर्थिक उत्पन्न घटत आहे.
गेल्या महिन्याच्या ११ तारखेपासून सकाळी ६ ते ६.४५ ही बॅच केवळ महिलांसाठी राखीव करण्याचा निर्णय महापालिकेतर्फे घेण्यात आला. पूर्वी दुपारी २ ते २.४५ ही एक बॅच महिलांची होती. सध्या दिवसभरात २ बॅच महिलांसाठी आहेत. सध्या नेहरुनगर आणि सांगवीचा तलाव दुरुस्तीसाठी बंद आहे. उर्वरित ८ तलावांमध्ये सकाळच्या बॅचला महिलांचा अल्प प्रतिसाद आहे. काही तलावावर ५ ते १० इतक्याच महिला पोहण्यास हजेरी लावतात. त्यामुळे महिनाभराच्या आतच कमी प्रतिसाद असलेल्या तलावावर ही स्वतंत्र बॅच बंद करण्यात आली. केवळ तीनच तलावावर सकाळची बॅच सुरू होती. बॅच बंद केल्याने पुन्हा काही राजकीय नेत्यांनी पालिकेला त्या सुरू करण्यास भाग पाडले. अल्प प्रतिसादात सध्या सर्व ८ तलावांवरील सकाळच्या महिलांच्या बॅच सुरू आहेत.
शहरात एकूण तीन ते साडेतीन हजार पासधारक आहेत. उन्हाळ्यातील हंगामात पासधारकांची संख्या अधिक वाढते. सकाळची बॅच महिलांसाठी राखीव केल्याने पासधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दुपारची बॅच महिलांसाठी आहे. सकाळच्या बॅचला प्रतिसाद नाही. त्यामुळे सकाळची बॅच त्यांच्यासाठी राखीव करण्याची गरज नसल्याचे त्याचे मत आहे. ही तक्रार कायम आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात महापालिकेचे आर्थिक उत्पन्न घटत आहे.
दरम्यान, सकाळच्या वेळेत महिलांना घरात भरपूर कामे असतात. त्यामुळे त्यांना या वेळेत पोहण्यास जाता येत नाही. दुपारनंतर रिकाम्या वेळेत हा प्रतिसाद वाढू शकतो. महिला बॅचमध्ये लहान मुलांना प्रवेश दिल्यास इतर बॅचवर होणारा परिणाम
काहीसा कमी होईल. १० वर्षांखालील मुलांना महिलांसोबत प्रवेश
देण्यास काहीच हरकत नाही. त्यानंतरच्या बॅचला येणाऱ्या मुलांची संख्या त्यामुळे कमी होईल आणि महिला बॅचला प्रतिसाद वाढेल, असा एक मतप्रवाह आहे.
शिबिरासाठी आरक्षण नसावे
उन्हाळा व दिवाळी सुटीत काही संस्था आणि स्पोटर््स क्लब
शिबिराच्या नावाखाली बॅचचे आरक्षण करतात. एका बॅचला
४०० रुपये भाडे भरले जाते.
साधारण २० ते २५ दिवसांचे शिबिर असते. त्यासाठी ते प्रत्येकाकडून एक हजार ते दीड हजारांचे शुल्क आकारतात. मात्र, ऐन हंगामात या शिबिरासाठी २ ते ३ बॅच राखीव
केल्या जातात. त्यामुळे पोहण्यास येणाऱ्यांची मोठी गैरसोय होते. हंगाम काळात शिबिराला आरक्षण देण्याची पद्धत बंद केल्यास पोहणाऱ्यांची संख्या वाढेल.