मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ 4 कोटी रुपयांची रोकड पकडली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 11:01 AM2022-03-30T11:01:29+5:302022-03-30T11:11:27+5:30

सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान एक संशयित कार मुंबईकडून पुण्याकडे जात होताी...

cash worth 4 crore seized near lonavla on mumbai pune expressway | मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ 4 कोटी रुपयांची रोकड पकडली

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ 4 कोटी रुपयांची रोकड पकडली

googlenewsNext

लोणावळा :लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर चार कोटी रुपयांची रोकड पकडली आहे (pune mumbai expressway 4 crore seized by police). सोमवारी (दि. 28) रोजी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दिली.

ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 मार्च रोजी गोपनीय माहिती प्राप्त झाली की, मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर अवैधरीत्या शत्र व पैशाची वाहतूक होणार आहे. त्या बातमीची शहानिशा व खातर जमा करण्यासाठी पोलीस स्टेशन लोणावळा ग्रामीणचे एक पथक नेमण्यात आले होते. सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान एक संशयित कार मुंबईकडून पुण्याकडे जाताना मिळून आली. तिला थांबवण्यासाठी इशारा केला असता तेव्हा ती पुढे निघून जाऊ लागली.

त्यावेळी पोलीस पथकाने कौशल्याने तिला ताब्यात घेण्यात आले सदर कार (KA 53 MB 8508) क्रमांकाची मारुती स्विफ्ट कार चेक करण्यात आली. तेव्हा सदर कार मध्ये एक चोर कप्यात चेक केले असता 4 करोड रुपयाची रोख रक्कम चालक नामे महेश नाना माने (रा. विठा जि. सांगली) व विकास संभाजी घाडगे (रा. शेटफळ जि. सांगली) यांच्या ताब्यात मिळून आली आहे.

सदर रक्कमेबाबत विचारपूस करता त्या संबंधी कागदपत्रे अथवा पुरावे व वाहतूक परवाना व त्याबाबतचे कारण त्यांना सांगता आले नाही. पोलीस निरीक्षक मोरे म्हणाले, सदरच्या रक्कमेबाबत माहिती घेण्याचे काम चालू असून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम कोठून व कशासाठी आणली तसेच लपून छपून कोणतेही कागदपत्र नसताना वाहतूक करताना मिळून आली. या बाबतची माहीती व शोध घेण्यात येत असून सदर प्रकरणी आयकर विभाग पुणे यांना कळविण्यात आले आहे. पुढिल कारवाई आयकर विभाग हे करीत आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण मोरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, सहा फौजदार शिताराम बोकड, युवराज बनसोडे, पोलीस हवालदार अमित ठोसर, महिला पोलीस नाईक पुष्पा घुगे, पोलीस नाईक गणेश होळकर, किशोर पवार, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर शिंदे यांनी केली आहे.

Web Title: cash worth 4 crore seized near lonavla on mumbai pune expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.