ससूनमध्ये कॅशलेस सुविधा
By admin | Published: December 22, 2016 02:23 AM2016-12-22T02:23:15+5:302016-12-22T02:23:15+5:30
नोटाबंदीमुळे नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन ससून शासकीय रुग्णालयाने कॅशलेस सुविधा सुरू केली आहे. रुग्णांसोबतच
पुणे : नोटाबंदीमुळे नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन ससून शासकीय रुग्णालयाने कॅशलेस सुविधा सुरू केली आहे.
रुग्णांसोबतच बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले शुल्क भरणे सोयीचे व्हावे, यासाठी रुग्णालयात स्वाइप मशीन आणण्यात आली आहेत. बँक आॅफ बडोदाच्या सहकार्याने हे मशीन देण्यात आले असून, रुग्णांच्या नातेवाइकांकडून या मशीनचे उद्घाटन करण्यात आले.
या उपक्रमाबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ‘‘केंद्र शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयानुसार रुग्णालयातील व्यवहार कॅशलेस करणे, हे एक आव्हान होते. अचानक झालेल्या नोटाबंदीमुळे दैनंदिन व्यवहाराबरोबरच वैद्यकीय खर्च करणे सुरळीत व्हावे, यासाठी हा उपाय उपयुक्त ठरेल. यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही.’’
या वेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. सोमनाथ सलगर, डॉ. इब्राहिम अन्सारी, डॉ. पराग वऱ्हाडे, डॉ. अजित मोरे, वर्षा पवार उपस्थित होत्या.
(प्रतिनिधी)