कॅशलेस व्यवहार सुरक्षित पद्धत : पोळ

By admin | Published: January 25, 2017 11:50 PM2017-01-25T23:50:14+5:302017-01-25T23:50:14+5:30

अनभिज्ञता, गैरसमज व अज्ञानामुळे नागरिक ‘कॅशलेस’ व्यवहार पद्धतीपासून दूर राहत आहेत. मात्र कॅशलेस व्यवहार पद्धती सुरक्षित पद्धती आहे

Cashless transaction safe method: Poll | कॅशलेस व्यवहार सुरक्षित पद्धत : पोळ

कॅशलेस व्यवहार सुरक्षित पद्धत : पोळ

Next

शिरूर : अनभिज्ञता, गैरसमज व अज्ञानामुळे नागरिक ‘कॅशलेस’ व्यवहार पद्धतीपासून दूर राहत आहेत. मात्र कॅशलेस व्यवहार पद्धती सुरक्षित पद्धती आहे, असे मत तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी व्यक्त केले. कॅशलेस पद्धतीचा अवलंब केलेली शिरूर नगरपरिषद ही राज्यातील पहिली नगरपरिषद असल्याचे पोळ यांनी या वेळी नमूद केले.
केंद्र व राज्य सरकारच्या नवीन आर्थिक धोरणानुसार शिरूर नगरपरिषदेने ‘कॅशलेस’ व्यवहार पद्धतीचा अवलंब आजपासून सुरुवात केली. यानिमित्त आयोजित कार्यशाळेप्रसंगी तहसीलदार पोळ बोलत होते. नगरध्यक्षा सुवर्णा लोळगे अध्यक्षस्थानी होत्या. वैशाली वाखारे, उज्ज्वला बरमेचा, अलका सरोदे, सुनीता कालेवार, जाकिरखान पठाण, संतोष भंडारी, अशोक पवार, आबीद शेख, कविता वाटमारे, संगीता शेजवळ, मुजफ्फर कुरेशी, मनीषा कालेकार, अभिजित पाचर्णे, विठ्ठल पवार, विनोद भालेराव, मंगेश खांडरे, संगीता मल्लाव, सुरेखा शितोळे, रोहिणी बनकर, अंजली थोरात, रेश्मा लोखंडे, जयश्री लोखंडे, पूजा जाधव, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ शिक्षण मंडळ सदस्य, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
एचडीएफसी बँक कॅशलेसबाबत नगरपरिषदेस सहकार्य करणार असून, कॅशलेस व्यवहारासाठी लागणारे ‘ट्रान्झॅक्शन चार्जेस’ बँक नागरिकांकडून घेणार नसल्याचे शाखा व्यवस्थापक बाबाजी शेटे यांनी सांगितले. बँकेचे वरिष्ठ अधिकारी मोहित वशिष्ठ, उदय रोकडे, तसेच एसबीआय, आयडीबीआय, बँक आॅफ इंडिया, बँकांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. चिंतामणी यांनी नगरपरिषदेच्या वेबसाइटविषयी माहिती दिली. रोकडे यांनी आॅनलाइन विषयी तसेच एकूणच ‘कॅशलेस’ पद्धतीविषयी मार्गदर्शन केले.

Web Title: Cashless transaction safe method: Poll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.