किरण जठार यांचे जात प्रमाणपत्र अवैधच
By Admin | Published: July 16, 2017 03:55 AM2017-07-16T03:55:27+5:302017-07-16T03:55:27+5:30
जातीचा बनावट दाखला सादर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका किरण जठार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जातीचा बनावट दाखला सादर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका किरण जठार यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनेही अवैध ठरवले आहे. त्यामुळे आता फर्जाना शेख यांच्यानंतर भाजपाच्या दुसऱ्या नगरसेविकेचे पद रद्द होणार आहे.
किरण जठार यांचे पती नीलेश यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले असल्याचे सांगितले. किरण यांच्या आजोबांचा जातीचा दाखला आम्ही दिला होता. त्याबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. आम्ही दिलेले अन्य पुरावे मात्र वादातीत आहेत. त्याबद्दल आम्ही दाद मागितली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर ऊर्फ बाळासाहेब धनकवडे यांचेही नगरसेवकपदही जातीचा दाखला पडताळणी समितीने अवैध ठरविले. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी त्वरित त्यांचे नगरसेवकपद रद्द करीत असल्याचे पत्र प्रसिद्ध केले. तसे किरण जठार किंवा फर्जाना शेख यांच्याबाबत मात्र झालेले नाही. मात्र निवडणूक शाखेचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी सांगितले, की पडताळणी समितीचा जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचा निर्णय झाला त्या दिवसापासूनच नगरसेवकपद रद्द होते. आयुक्तांचे पत्र केवळ निवेदन असते.