मोहोळचे आमदार यशवंत माने यांचे जातवैधता प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:11 AM2021-03-07T04:11:29+5:302021-03-07T04:11:29+5:30
शिवसेनेचे पराभूत उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांचा मुलगा सोमेश क्षीरसागर यांनी आमदार माने व त्यांचे बंधू हनुमंत माने ...
शिवसेनेचे पराभूत उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांचा मुलगा सोमेश क्षीरसागर यांनी आमदार माने व त्यांचे बंधू हनुमंत माने यांच्या विरोधात जातीचा दाखल व जात वैधता प्रमाणपत्र हे अवैध असल्याची याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे.
उच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा एकदा आमदार यशवंत माने व कुटुंबाच्या जातीचा दाखल व जात वैधता प्रमाणपत्राबद्द्ल खरेपणा समोर आला आहे. जिल्हा जात पडताळणी समिती बुलढाणा यांनी आमदार यशवंत माने व त्यांचे बंधू हनुमंत माने यांचा जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल यापूर्वी २२ सप्टेंबर २०१८ व ६ नोव्हेंबर २०२० रोजी व नागपूर खंडपीठाने ३१ ऑगस्ट २०२० रोजी दिला आहे. ७ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने क्षीरसागर यांची याचिका फेटाळली आहे.
आमदार यशवंत माने म्हणाले, राजकीय व्देषातून इंदापूर तालुक्यातील छुप्या विरोधकांच्या मदतीने सोमेश क्षीरसागर यांनी दाखल केलेली याचिका पूर्णतः खोटी असल्याचे उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सिध्द झाले आहे. आमचा न्यायदेवतावर पूर्ण विश्वास आहे.