हवेतील इमले बिल्डरला नडले
By admin | Published: November 2, 2014 01:31 AM2014-11-02T01:31:58+5:302014-11-02T01:31:58+5:30
आठव्या आणि अकराव्या मजल्यावरील फ्लॅटची विक्री करून हवेतील इमले विकणा:या धरती इन्फ्रास्ट्रक्चरच्या बिल्डरला पोलिसांनी अटक केली आहे.
Next
पुणो : इमारतीला सात मजल्यांच्या बांधकामासच परवानगी मिळालेली असताना आठव्या आणि अकराव्या मजल्यावरील फ्लॅटची विक्री करून हवेतील इमले विकणा:या धरती इन्फ्रास्ट्रक्चरच्या बिल्डरला पोलिसांनी अटक केली आहे. बाणोर येथे सात मजल्यांच्या इमारतीचे काम सुरू होते. बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक यशवंत पाटील (रा. करिष्मा बिल्डिंग, कोथरूड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रवींद्र एकनाथ कुमावत यांनी तक्रार दाखल केली आहे.
बाणोर येथील सव्र्हे नं. 33मधील 1/16 ही रवींद्र कुमावत यांच्या मालकीची जागा त्यांनी 7 कोटी रुपयांना दीपक पाटील यांना विकली. या ठिकाणी होणा:या सिद्धान्त कोर्ट यार्ड या इमारतीमधील 7 फ्लॅट 3 कोटी 8 लाख रुपयांना देण्याचा करार दोघांमध्ये झाला होता. त्याप्रमाणो हवेली दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्तही नोंदविण्यात आला. कुमावत यांना 2:या, 3:या, 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या व 11व्या मजल्यावरील फ्लॅटची विक्री करण्यात आली होती.
कुमावत यांनी इमारतीचे काम सुरू असताना पाहणी केली असता ती इमारत केवळ 7 मजल्यांची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी महापालिकेतून माहिती घेतली असता त्या इमारतीला केवळ 7 मजल्यांचीच मान्यता देण्यात आली असून, यापुढे त्या ठिकाणी मजले वाढविता येणार नसल्याची माहिती मिळाली. आठवा व अकरावा मजला अस्तित्वात नसतानाही त्या मजल्यावरील फ्लॅटची विक्री करून आपली फसवणूक करण्यात आल्याचे कुमावत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी बिल्डर दीपक यशवंत पाटील याला अटक केली. (प्रतिनिधी)