थकबाकीदारांच्या घरासमोर वाजंत्री
By admin | Published: February 5, 2016 02:14 AM2016-02-05T02:14:46+5:302016-02-05T02:14:46+5:30
नगरपालिका हद्दीतील वसुलीसाठी मिळकतधारकांच्या घर आणि गाळ्यांसमोर वाजंत्री लावली जात आहेत. याशिवाय पोस्टकार्ड, एसएमएस आदींद्वारेही नागरिकांना कर
बारामती : नगरपालिका हद्दीतील वसुलीसाठी मिळकतधारकांच्या घर आणि गाळ्यांसमोर वाजंत्री लावली जात आहेत. याशिवाय पोस्टकार्ड, एसएमएस आदींद्वारेही नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या करापोटी १४ कोटी रुपये येणे आहे, अशी माहिती मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी दिली.
मालमत्ताकर विभागाने मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करवसुलीसाठी कंबर कसली आहे. शिक्षणकर, रोजगार हमी कर, मालमत्ताकर व पाणीपट्टी वसुलीसाठी नगरपालिकेने हा नवीन फंडा वापरला आहे. वाजंत्र्यांचे पथक थकबाकीदाराकडे जात आहे. घर-गाळ्यांसमोर वाजंत्री दणदणाट करीत आहेत. यामुळे परिसरात चर्चेचा विषय होत आहे. त्यामुळे थकबाकीदाराला तोंड लपविणे अशक्य होत आहे. या थकबाकीदारांचे मोबाईल क्रमांक, नावे नगरपालिकेकडे आहेत, त्या माध्यमातूनही एसएमएस पाठवून कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता पोस्टकार्ड थकबाकीदारांना पोस्टकार्ड पाठवून थकीत व चालू कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. जे नागरिक कर भरणा करीत आहेत, त्यांना आभाराचेही पोस्टकार्ड नगरपालिकेकडून पाठवण्यात येत आहे. नगरपालिकेचा १ कोटी ८ लाखाचा शिक्षणकर थकीत आहे, तर चालू मागणी १ कोटी ७० लाखांची आहे. रोजगार हमीकर सुमारे १२ लाखांचा थकीत आहे. .