लाचखोर पकडा; कामे मार्गी लागतील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 01:59 AM2018-11-01T01:59:21+5:302018-11-01T02:00:00+5:30
लाचखोराला पकडून दिल्यावर तक्रारदाराचे काम लवकर होतेच, परंतु इतरांचीही कामे मार्गी लागतात. एका अर्थाने समाजसेवाच घडते, असे आजपर्यंतच्या उदाहरणांवरून पुढे आले आहे.
- विवेक भुसे
पुणे : लाच मागितल्यावर प्रचंड चीड येते; तक्रार करण्याचीही इच्छा होते. पण आपले काम आणखी अडेल, अशा भीतीने नागरिक तक्रार करण्यास घाबरतात. पण घाबरू नका. लाचखोराला पकडून दिल्यावर तक्रारदाराचे काम लवकर होतेच, परंतु इतरांचीही कामे मार्गी लागतात. एका अर्थाने समाजसेवाच घडते, असे आजपर्यंतच्या उदाहरणांवरून पुढे आले आहे.
‘लोकमत’ने काही तक्रारदारांशी संपर्क साधला असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा चांगला अनुभव आला असून तेथील अधिकारी सापळा कारवाई झाल्यानंतरही काम पूर्ण होईपर्यंत संपर्कात असल्याचे सांगितले़ याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुहास नाडगौडा यांनी सांगितले की, सापळा लावून पकडलेल्या कर्मचारी अथवा अधिकाऱ्याच्या वरिष्ठाला दुसºया दिवशी आमच्या कार्यालयात बोलावले जाते. त्यांचा जबाब घेतला जातो़ त्यात कारवाई झालेल्या अधिकारी, कर्मचाºयाकडे कार्यालयात कोणती जबाबदारी आहे़ त्यांच्या कामाचे स्वरूप काय होते.
तक्रारदाराचे काम का अडले होते, अशी माहिती घेतली जाते़ त्याशिवाय या गुन्ह्यात या अधिकाºयाचा काही सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जाते़ संबंधित तक्रारदार यांचे कायदेशीर काम कोठेही अडणार नाही़ यासाठी त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला जातो़ त्यामुळे कोणत्याही तक्रारदाराचे कायदेशीर काम कधी अडत नाही.
५ महिने अडलेले काम १५ दिवसांत झाले
पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणात माझी जमीन जात होती़ त्याचा ८४ लाख रुपयांचा मोबदला मला मिळणार होता़ तो धनादेश भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकाºयांकडे तयार होता़ परंतु, ४ ते ५ महिने तो मिळत नव्हता़ उपजिल्हाधिकाºयांनी त्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितली होती़ मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ त्यानंतर दीड लाख रुपये लाच देण्याची तडजोड झाली़ त्याप्रमाणे सापळा रचून त्या उपजिल्हाधिकाºयांना पकडण्यात आले़ त्यानंतर त्यांच्या जागी नवीन अधिकाºयांची नेमणूक होण्यास काही वेळ गेला़ नवीन अधिकारी येताच त्यांनी तातडीने धनादेश दिला़ जे काम ५ महिने रखडलेले होते ते तक्रार दिल्यानंतर १५ दिवसांत झाले़
साहित्य परत मिळाले
लोणावळ्यातील शेतजमीन बेकायदेशीर प्रवेश करून बांधकाम केल्याप्रकरणी वन विभागाच्या वनपाल व इतरांनी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या ठेकेदारचा जेसीबी व इतर साहित्य जप्त करण्यात आले होती़ ते सोडविण्यासाठी तेथील वनपाल याने १५ लाख रुपये मागितले होते़ त्यानंतर ११ लाख रुपयांवर तडजोड झाली़ सापळा रचून वनपालाला पकडण्यात आले़ या जागे उच्च न्यायालयात दावा चालू आहे़ आम्ही अर्ज केल्यानंतर आता काही अटी व शर्तीवर जप्त केलेले साहित्य वन विभागाने परत केले असल्याचे तक्रारदाराने सांगितले.
अशीही समाजसेवा संपूर्ण तालुक्यातील सातबाराच्या नोंदी
मुळशी तालुक्यातील एका तलाठ्याने सात बारा वर नोंद करण्यासाठी लाच मागितली होती़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्या तलाठ्याला पकडले़ त्यानंतर दुसºया दिवशी मुळशी तालुक्याचे तहसीदारांना जबाबासाठी बोलविण्यात आले़ तक्रारदारांचे काम का अडले होते़ सात बारावर नोंद करण्यात काय अडचणी आहेत याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली़ त्यानंतर संपूर्ण तालुक्यात सातबारावर नोंद करण्यासाठी अर्ज आले़ त्याचा आढावा घेतला व एक महिन्याच्या आत या सर्व अर्जांच्या नोंदी होऊन ते निकाली निघतील, याकडे स्वत: जातीने लक्ष दिले़