मांजर आणि उंदीर (नवा खेळ)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:12 AM2021-09-03T04:12:11+5:302021-09-03T04:12:11+5:30
काय साध्य होईल : धावण्याची क्षमता सिद्ध होईल. सज्जतेसाठी घोषणा : मांजर करते म्याँव म्याँव. खेळ खेळायचा कसा : ...
काय साध्य होईल : धावण्याची क्षमता सिद्ध होईल.
सज्जतेसाठी घोषणा : मांजर करते म्याँव म्याँव.
खेळ खेळायचा कसा :
मैदानात एक मोठा आयत आखून घेऊन आयताच्या एका टोकाला सर्व खेळाडू उभे राहतील. त्यांच्या समोरील बाजूला आयताच्या मधोमध एक छोटा चौकोन/गोल आखून घेऊन मांजर म्हणून एका मुलाला त्यात बसवावे. त्याची पाठ खेळाडूंकडे असेल. त्याने मागे पाहू नये. नंतर खेळ चालू होईल. शिक्षक नि खेळाडू हळू हळू पुढे येऊन :याला मांजर म्हणतात. काळ काळ मांजर, जाड जाड मांजर, बुटक बुटक मांजर इ. वेगवेगळ्या आवाजात मोठ्यानं म्हणत त्या मांजराजवळ जायचे. जरा वेळ थांबून त्याच्या पाठीला स्पर्श करून सर्व उंदीर पळायला लागतील. (मागे चौकोनाच्या बाहेर) कारण त्या चौकोनात असेपर्यंत मांजराला उंदीर पकडण्यास वाव असतो. चौकोनात जेवढ्या उंदरांना (मुलांना) मांजर स्पर्श करील ते सर्व बाद होतात. बाद होणारे सर्व उंदीर बाहेर बसतील.
सूचना : मांजर चौकोनाच्या बाहेर जाणार नाही. शेवटी सर्व उंदीर संपलेले असतील.
--
सोपान बंदावणे
--