मांजरीची खुर्दचा कडक लॉकडाऊन यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:20+5:302021-05-16T04:11:20+5:30
मांजरी खुर्द गावात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्याचबरोबर कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
मांजरी खुर्द गावात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्याचबरोबर कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गावात रोज सरासरी पाच ते दहापेक्षा जास्त पाॅझिटिव्ह रुग्ण आढळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढु लागल्यामुळे एक खबरदारीचा उपाय म्हणून गावात ग्रामपंचायत दक्षता समिती व ग्रामपंचायत च्या वतीने तातडीची बैठक आयोजित करून दहा दिवसांचा कडक लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. मेडिकल व डाॅक्टर सोडून संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याला सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.कोरोनाची साखळी तुटण्यासाठी या बंदचा उपयोग होईल असे सरपंच विकास उंदरे ,उपसरपंच किशोर उंदरे यांनी सांगितले. नियमांचे उल्लंघन केले तर दंडाची कारवाई करण्यात येईल,अथवा पोलिसात तक्रार करण्यात येईल, असे सदस्य स्वप्निल उंदरे यांनी सांगितले.
यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करून मीटिंग घेण्यात आली या कडकडीत बंद ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ पोलीस पाटील इतर मान्यवर उपस्थित होते.