मांजरी पूल पाण्याखाली
By admin | Published: July 31, 2014 02:06 AM2014-07-31T02:06:25+5:302014-07-31T02:06:25+5:30
मांजरीच्या पुलावरून पाणी गेल्याने मांजरीचा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे १५ ते २0 गावांचा परस्परांशी आणि शहराशी असलेला संपर्क तुटला आहे
मांजरी : मांजरीच्या पुलावरून पाणी गेल्याने मांजरीचा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे १५ ते २0 गावांचा परस्परांशी आणि शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. वाहतूकदारांना लांबून प्रवास करावा लागला. अनेक वाहनचालकांना पुलाजवळ येऊन माघारी जावे लागले. पुलावर पाणी आल्याने गावातील नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती.
गेले दोन दिवस सतत पाऊस पडत असल्याने नदीला व धरणातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने मंगळवारी रात्री ८ वाजता २ हजार ५०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. त्यामुळे बुधवारी सकाळी पहाटे
येथील पूल पाण्याखाली बुडाला. नदीत जलपर्णी वाहून आल्याने मोठ्या प्रमाणात जलपर्णी पुलाच्या कठड्याला अडकली आहे.
या जलपर्र्णीने डासांचे प्रमाण वाढणार आहे. काही नागरिकांनी जलपर्णी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने जलपर्णी पाण्यामध्ये जाऊन ती काढण्याचे टाळले. मांजरी बुद्रुकमध्ये पोलीस चौकीचे शिपाई पुलाच्या बाजूला सुरक्षा म्हणून थांबले होते.