कुंजीरवाडीतील गुऱ्हाळे झाली प्लॅस्टिकमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:10 AM2021-04-02T04:10:46+5:302021-04-02T04:10:46+5:30
‘लोकमत’मध्ये ३१ मार्च रोजी गुऱ्हाळ घरातील प्लॅस्टिकमुळे जीवघेणे प्रदूषण अशी बातमी प्रकाशित झाली. त्याची गंभीर दखल घेत प्राथमिक आरोग्य ...
‘लोकमत’मध्ये ३१ मार्च रोजी गुऱ्हाळ घरातील प्लॅस्टिकमुळे जीवघेणे प्रदूषण अशी बातमी प्रकाशित झाली. त्याची गंभीर दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ. लुकडे यांनी परिसरातील सर्व गुऱ्हाळघरांना नोटील बजावली होती. त्यानंतर एका टीमने प्रत्यक्ष गुऱ्हाळघरात जाऊन तेथे तपासणी केलीव प्लॅस्टिकचा कचरा न जाळण्याबाबत सूचना दिल्या. याबाबत कुंजीरवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टीमने ही कार्यवाही केल्यामुळे व म्हातोबा आळंदी ग्रामपंचायत प्रशासनाने लक्षपूर्वक ही बाब समोर आणल्याकारणाने तसेच ‘लोकमत’ने या बाबीचा पाठपुरावा केल्यामुळे स्थानिकांनी याबाबत कौतुक केले.
सध्या प्लॅस्टिकचा प्रश्न जरी मिटला असेल तरी देखील नियमानुसार ही गुऱ्हाळे चालवली जावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहेत. याठिकाणी स्वच्छतेची कमतरता असून येथील कामगारांची वेळोवेळी आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे. याठिकाणी अत्यंत कमी मोबदल्यात परप्रांतीय कामगार काम करत असून त्यांच्या भविष्याची व आरोग्याची हेळसांड होऊ नये म्हणून विविध समितीनी यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे.
--
खर्च वाचविण्यासाठी कचला जाळला जातो
गुऱ्हाळ मालक
परिसरातील कारखाना बंद पडलेला आहे तसेच इतर कारखान्यावर ऊस नेला तरी त्याचे पेमेंट योग्यरीत्या व वेळेवर मिळत नाही त्यामुळे अनेक शेतकरी वर्ग हा या उद्योगाकडे वळलेला आहे. गुऱ्हाळाच्या भट्टीची आग जास्त वेळ सुरू राहण्यासाठी आम्ही प्लॅस्टिकचे टायर, चपला, बूट जाळत असतो या गोष्टी सहजच आणि स्वस्त दरात आम्हाला मिळत असल्याने इंधनासाठी लागणारा इतर खर्च वाचत असल्याचे काहींनी सांगितले.