विक्रीसाठी आणलेले मांडूळ दोघांकडून जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:33 AM2019-01-12T01:33:28+5:302019-01-12T01:34:23+5:30

विक्रीसाठी आणलेले चार लाख रुपये किमतीचे मांडूळ गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जप्त केले.

Caught by the couple for sale | विक्रीसाठी आणलेले मांडूळ दोघांकडून जप्त

विक्रीसाठी आणलेले मांडूळ दोघांकडून जप्त

Next

पिंपरी : विक्रीसाठी आणलेले चार लाख रुपये किमतीचे मांडूळ गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जप्त केले. ही कारवाई गुरुवारी पुणे-नाशिक रस्त्यावर मोशी येथे करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. हेमंत संजू पवार (वय २१, रा. शिवाजीनगर, ८०६, कामगार पुतळा, पुणे), आकाश बापू वाघमारे (वय २२, रा. बीटी कवडे रोड, भीमनगर झोपडपट्टी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अभय महादेव भवारी (वय ३८, रा. किरकीटवाडी, खडकवासला) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक रस्त्यावरील मोशी येथील काजळे पेट्रोल पंपाजवळ दोन व्यक्ती मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलीस शिपाई गणेश मालुसरे यांनी गिºहाईक म्हणून आरोपींशी संपर्क साधला असता त्यांनी मांडूळ प्रजातीच्या सापाची किंमत पाच लाख रुपये सांगितली. त्यानंतर हा साप चार लाख रुपयांना देण्याचे ठरले होते. त्यानुसार युनिट एकचे पथक काजळे पेट्रोल पंपाजवळ सापळा लावून थांबले. दरम्यान, मांडूळ घेऊन आरोपी त्या ठिकाणी आले असता दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ३६ इंच लांबीचे, सहा इंच गोलाईचे व अडीच किलो वजनाचे मांडूळ ताब्यात घेण्यात आले.
 

Web Title: Caught by the couple for sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.