सात बारावरील दुरुस्तीच्या प्रतीसाठी तलाठ्याला लाच घेताना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 02:30 PM2018-08-30T14:30:01+5:302018-08-30T14:32:24+5:30
जमीन खरेदी केल्यानंतर त्याची सात बारावरील नोंद चुकीची झाली होती़ ती दुरुस्त केल्यावर त्याची प्रत देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले़.
पुणे : जमीन खरेदी केल्यानंतर त्याची सात बारावरील नोंद चुकीची झाली होती़. ती दुरुस्त केल्यावर त्याची प्रत देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले़. गेणभाऊ जयवंत शेवाळे (वय ५२, रा़. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) असे या तलाठ्याचे नाव आहे़. तक्रारदार यांनी कदमवाकवस्ती येथे २० गुंठे जमीन खरेदी केली होती़. या खरेदीची सात बाराच्या उताऱ्यावर चुकीची नोंद करण्यात आली होती़. त्यांनी नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्ज केला होता़. त्यावरुन दुरुस्त करण्यात आलेल्या सात बाराची प्रतीवर सही शिक्का देऊन सात बाराची प्रत देण्यासाठी तलाठी शेवाळे यांनी २ हजार रुपयांची लाच मागितली होती़.
त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़. त्याची पडताळणी केल्यानंतर बुधवारी गेणभाऊ शेवाळे यांच्या कदमवाकवस्ती येथील घरी सापळा रचण्यात आला़. त्यांनी तक्रारदार यांच्याकडून २ हजार रुपये स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले़. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.