रावणगावला गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:09 AM2021-06-06T04:09:09+5:302021-06-06T04:09:09+5:30
याबाबत शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २७) यांनी अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो एमएच ०१ डीआर १५४२ वरील अज्ञातचालक व ...
याबाबत शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २७) यांनी अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो एमएच ०१ डीआर १५४२ वरील अज्ञातचालक व क्लिनर यांच्यावर फिर्याद दाखल केली आहे.
रावणगाव गावच्या हद्दीत पिवचीआई मंदिराजवळ पुणे-सोलापूर हायवे रोडवर अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो (नंबर एमएच ०१ डीआर १५४२) यावरील अज्ञात चालक व क्लिनर यांनी बेकायदेशीरपणे त्यांचेकडे पशुसंवर्धन विभागाचा परवाना नसताना गोवंश कापण्यास व वाहतूक करण्यास बंदी असताना अंदाजे दोन टन वजनाचे गोमांस सदर टेम्पोत घेऊन जात असताना आढळून आले. त्यावेळी त्यांना थांबवण्याचा इशारा केला असता चालक व क्लिनर हे टेम्पो रोडच्या कडेला उभा करून टेम्पोची चावी घेऊन पळून गेले. सदर चालक व क्लिनर तसेच गाई व बैल कापणारे गोमांस विकत घेणारे टेम्पोमालक यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलीस हवालदार राऊत हे दाखल अंमलदार तर पोलीस उपनिरीक्षक लोंढे तपासी अंमलदार म्हणून काम पाहत आहेत.