काँग्रेस-राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप, कचरा डेपो उभारत असल्याचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 03:02 AM2018-01-30T03:02:50+5:302018-01-30T03:03:26+5:30

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोरगरिबांच्या घरांसाठी आरक्षित असणाºया ज्योतिबा मंदिरानजीकच्या जागेवर नगर परिषद कचरा डेपो उभारत असल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली.

 The cause of allegations and reactions in the Congress-NCP is being formed | काँग्रेस-राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप, कचरा डेपो उभारत असल्याचे कारण

काँग्रेस-राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप, कचरा डेपो उभारत असल्याचे कारण

Next

इंदापूर : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोरगरिबांच्या घरांसाठी आरक्षित असणाºया ज्योतिबा मंदिरानजीकच्या जागेवर नगर परिषद कचरा डेपो उभारत असल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली.
सभागृहात मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांना घेराव घालून तब्बल ३ तास सत्ताधारी गट व प्रशासकीय अधिकाºयांना धारेवर धरले. सभागृहाबाहेर सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
सभा संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सभागृहात मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांना घेराव घातला. स्वत:लाही सभागृहात कोंडून घेतले. नगरसेवकांनी नगर परिषदेच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला.
विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, गटनेते गजानन गवळी, श्रीधर बाब्रस, राजश्री मखरे, हेमलता माळुंजकर, उषा स्वामी, मधुरा ढवळे, अमर गाडे आदींनी प्रश्नांची सरबत्ती करीत सभागृह दणाणून सोडले. मुख्याधिकारी झंवर त्यांच्या प्रश्नांना अपेक्षित उत्तर देत नाहीत, आपले म्हणणे गांभीर्याने घेत नाहीत, असे वाटल्यानंतर नगरसेवकांनी थेट आमदार दत्तात्रय भरणे यांना फोनवरून प्रकरणाची माहिती दिली.
मुख्याधिकाºयांनी लेखी उत्तर द्यावे; मगच आम्ही सभागृहातून बाहेर जाऊ, असा पवित्रा घेतला. या वेळी रात्रीचे ८ वाजले होते. दरम्यान, ‘मला कोंडून ठेवले म्हणून मी जिल्हाधिकाºयांना कळवतो,’ असा पवित्रा मुख्याधिकाºयांनी घेतला. त्याच वेळी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अडथळा आणला; त्यामुळे कायदेशीर कारवाईची मागणी करा, अशी चिथावणी काँग्रेसचे कार्यकर्ते देत होते. या स्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. आमदार भरणे यांची घनकचरा प्रकरणी सहमती असल्याबाबत बोलणी झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.
त्याचेही सभागृहात व बाहेर पडसाद उमटले. कार्यालयीन व्यवस्थापक गजानन पुंडे यांनी मध्यस्थी करून लेखी देण्यासाठी मुख्याधिकाºयांची व नगरसेवकांची समजूत घातली. रात्री साडेनऊ वाजता नगरसेवकांना लेखी पत्र मिळाले. तोपर्यंत मुख्याधिकाºयांच्या कार्यालयासमोर नगरसेवकांनी ठिय्या मांडला होता. सत्ताधारी नगरसेवक व कार्यकर्ते नगर परिषदेमध्ये बसून होते.

नगर परिषदेने उजनी धरण व्यवस्थापन विभागाकडील गट नं. ३४ / १ / अ / २ मधील १ हे ८५ आर क्षेत्र घनकचरा व्यवस्थापनाकरिता शासनाकडे मागितले आहे. त्याचे १७ लाख ४४ हजार ५५० रुपये दिले आहेत.
मात्र, जागा हस्तांतरास विलंब होत आहे; त्यामुळे या जागेवर घनकचरा प्रक्रिया करण्यासाठी पत्रा शेड व जोत्याचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याला मान्यता घेण्यासाठी प्रशासकीय बाब म्हणून पत्रव्यवहार करणे आवश्यक होते.
याबाबत निर्णय घेण्यास सभागृह सक्षम आहे, असे मुख्याधिकाºयांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

कचरा डेपोसंदर्भात वेळोवेळी ठराव

मागील १५ ते २० वर्षांपासून ज्योतिबा मंदिर परिसराच्या जागेत कचरा डेपो आहे. घनकचरा प्रक्रियेसंदर्भात सभागृहात वेळोवेळी ठराव केला गेला आहे; मात्र कचरा डेपोचा नागरिकांना त्रास होतो.
मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. वारंवार कचरा डेपोला आग लागते. प्रदूषण वाढते, हे धोकादायक आहे. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. संत तुकोबामहाराज पालखी विश्वस्तांनीदेखील याबाबत नाराजी व्यक्त केली होती. नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेमध्ये इंदापूर शहराचा समावेश आहे.
ज्योतिबा मंदिर परिसराच्या सिटी सर्व्हे नं. १९७ (जुना गट नं. ८१०) जागेत नजीक दलित वस्त्या, आठभाईमळा, शिवाजीनगर, आश्रमशाळा, हायस्कूल, आयटीआय व लोकवस्ती आहे. म्हणूनच जाणीवपूर्वक कचरा डेपो केला जात आहे, असा आरोप सभागृहात नगरसेवक श्रीधर बाब्रस, राजश्री मखरे, गजानन गवळी यांनी केला.

Web Title:  The cause of allegations and reactions in the Congress-NCP is being formed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.