मृत्यूस कारणीभूत; 5 वर्षे सक्तमजुरी

By admin | Published: November 30, 2014 12:35 AM2014-11-30T00:35:23+5:302014-11-30T00:35:23+5:30

पूर्वीच्या जमिनीच्या वादातून मारहाण करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकाला 5 वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

Cause death; 5 years persistence | मृत्यूस कारणीभूत; 5 वर्षे सक्तमजुरी

मृत्यूस कारणीभूत; 5 वर्षे सक्तमजुरी

Next
पुणो  : पूर्वीच्या जमिनीच्या वादातून मारहाण करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकाला 5 वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. याबरोबरच मारहाणप्रकरणी चौघांना 6 महिने सक्तमजुरी आणि 5क्क् रुपये दंडाची, तर एका महिलेला 2 महिने सक्तमजुरी व 5क्क् रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खेड न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी हा आदेश दिला आहे. 
संदीप प्रभाकर टेंगळे (वय 27, रा. कोयाळी) याला 5 वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, गोवर्धन टेंगळे (वय 27), माणिक गंगाराम टेंगळे (वय 23), संपत प्रभारक टेंगळे (वय 33), युवराज सुदाम कोळेकर (वय 28) यांना 6 महिने सक्तमजुरी, तर हंसाबाई गंगाराम टेंगळे (वय 47, सर्वजण रा. कोयाळी, ता. खेड) यांना 2 महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जयवंत देवराम टेंगळे (वय 72) यांचा खून करण्यात आला होता. याबाबत त्यांची सून वैशाली महादेव टेंगळे (वय 35) यांनी फिर्याद दिली 
आहे. 
17 एप्रिल 2क्13 रोजी कायळी येथील रामुबाईमळा येथे ही घटना घडली.  (प्रतिनिधी)
 
4या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील अरुण ढमाले यांनी 1क् साक्षीदार तपासले. मयत, त्यांची प}ी, फिर्यादी आणि मुलगा सहादू हे फुले आणण्यासाठी रामुबाईमळा येथे गेले होते. त्या वेळी पूर्वीच्या जमिनीच्या वादातून संदीप याने जयवंत यांच्या डोक्यात काठी घातली. 
4फिर्यादी त्यांना सोडविण्यासाठी गेल्या, त्या वेळी उर्वरित सर्व आरोपींनी फिर्यादींना मारहाण केली. घटनेत जखमी झालेल्या जयवंत यांचा नंतर उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी न्यायालयाने सर्वाना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. 

 

Web Title: Cause death; 5 years persistence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.