स्त्री-भ्रूणहत्येमुळे गंभीर स्थिती

By admin | Published: March 6, 2016 01:07 AM2016-03-06T01:07:52+5:302016-03-06T01:07:52+5:30

स्त्री-भू्रणहत्येमुळे देशात मुलींची संख्या घटत चालल्याने पुरुषांच्या बरोबरीने महिलांचे घटते प्रमाण देशासमोर मोठी गंभीर समस्या आहे

Causes of female feticide | स्त्री-भ्रूणहत्येमुळे गंभीर स्थिती

स्त्री-भ्रूणहत्येमुळे गंभीर स्थिती

Next

राहू : स्त्री-भू्रणहत्येमुळे देशात मुलींची संख्या घटत चालल्याने पुरुषांच्या बरोबरीने महिलांचे घटते प्रमाण देशासमोर मोठी गंभीर समस्या आहे, असे मत शिवाजीनगर पुणे रोटरी क्लबच्या अध्यक्षा गौरी शिकारपूर यांनी व्यक्त केले.
वाळकी (ता. दौंड) येथे रोटरी क्लब, पुणे-शिवाजीनगर यांच्या वतीने वाळकी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींना ४१ सायकलींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
राहू जिल्हा परिषद केंद्रामध्ये पहिली आयएसओ म्हणून शाळेची ओळखली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने शाळेला गेल्या वर्षभरात १७ लाख रुपयांची भरीव मदत, तर सन २०१४ या आर्थिक वर्षामध्ये संगणक लॅब यासह इतर साहित्य ग्रामस्थांनी दिल्याचे मुख्याध्यापक यांनी सांगितले. या सर्व रकमेमधून शाळेत मुलांना स्वच्छ पाणी, अत्याधुनिक प्रयोगशाळा, दुमजली शाळेची इमारत उभारण्यात आल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले
तसेच, सायकलस्टॅण्डसाठी बाजार समितीचे संचालक बाळासाहेब थोरात, बाळासाहेब बापूराव थोरात, हरिभाऊ थोरात यांनी तसेच स्वच्छतागृह युनिटसाठी चंद्रकांत तापकीर यांनी निधी दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. या वेळी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव अब्यंकर, नितीन अभ्यंकर यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी अंजली अभ्यंकर, चंडू गोडसे, हेमा गोडसे, विनू दानी, संजीव चौधरी, प्रदीप वाघ, जयश्री वीरकर, प्रदीप हर्डीकर, श्रीराम सबनीस, बाळासाहेब थोरात, विमल चोरमले, दिलीप हांडे, दिगंबर थोरात, काका तापकीर, निळकंठ थोरात, बाळासाहेब पायगुडे, बाळासाहेब जोंधले, बाळासाहेब विखे, पोपट थोरात, भारत काळे, विजय थोरात, राजेंद्र जोंधले उपस्थित होते. विद्यार्थिनींनी स्वागत गीत गायले.

Web Title: Causes of female feticide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.