‘पॉस’मशीनद्वारे होणार धान्यवाटप

By admin | Published: May 20, 2017 05:07 AM2017-05-20T05:07:20+5:302017-05-20T05:07:20+5:30

पिंपरी-चिंचवड शहरात येत्या काही दिवसांतच रेशन दुकानातून ‘पॉस’ मशीनद्वारे धान्यवाटप सुरू करण्यात येणार आहे. यामुळे धान्याचा काळाबाजार थांबण्यास मदत

Causes of 'Poissement' | ‘पॉस’मशीनद्वारे होणार धान्यवाटप

‘पॉस’मशीनद्वारे होणार धान्यवाटप

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात येत्या काही दिवसांतच रेशन दुकानातून ‘पॉस’ मशीनद्वारे धान्यवाटप सुरू करण्यात येणार आहे. यामुळे धान्याचा काळाबाजार थांबण्यास मदत होणार आहे.
निगडीतील परिमंडळ कार्यालयात अ आणि ज विभाग असून या अंतर्गत अ विभागामध्ये १०४ तर ज विभागामध्ये ९४ स्वस्त धान्य दुकानदार आहेत. या दुकानांमधून केवळ शिधापत्रिकेवरच धान्य दिले जायचे. मात्र, आता यापुढे ‘पॉस’ मशीनद्वारे धान्यवाटप केले जाणार आहे. ज्या दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकेतील नागरिकांच्या आधार क्रमांक जोडणीसह संदर्भ रजिस्टर कार्यालयात जमा झाले आहे. त्यानुसारच धान्य दिले जाणार आहे.

मशीन ‘आधार’शी जोडणार
शिधापत्रिकाधारकाची संपूर्ण माहिती युनिट संख्या, आधार क्रमांक, धान्य वितरणाचे प्रमाण आदी माहिती यामध्ये असेल. पॉस मशीनसाठी आवश्यक असणारे कामकाज ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आधार जोडसह इतर कामकाज अंतिम टप्प्यात आल्यानंतर दुकानदारांना मशीन दिले जाणार आहेत. अद्यापही काही दुकानदारांनी १०० टक्के आधार जमा केलेले नाहीत. यापूर्वी आधार नसलेले धान्य घेऊन जात होते. आता तसे होणार नाही. जितके धान्य दिले, तेवढ्या रकमेची स्लीप बाहेर येणार आहे.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
शिधापत्रिकेतील माहितीचे संकलन करण्याच्या कामकाजाचे येथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या माहितीचे संगणकीकरणाचे कामकाज वेगात सुरू असून येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होणार आहे. सर्व माहितीचे संगणकीकरण झाल्यास नवीन नाव टाकणे, कमी करणे, बदल करणे अशा प्रकारचे कामकाज तातडीने होण्यास मदत होणार आहे.

‘पॉस’ मशीनसाठी आवश्यक असणारे कामकाज ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. ज्या दुकानदारांकडून आधार क्रमांक जोडणी जमा झाले आहेत, त्यानुसारच धान्य दिले जाणार आहे. यामुळे काळ्या बाजाराला आळा बसणार आहे. यापूर्वी आधार जोड नसलेले धान्य घेऊन जात होते. या प्रकाराला आळा बसणार आहे.
- के. एस. भोंडवे, परिमंडळ अधिकारी

Web Title: Causes of 'Poissement'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.