सीबीएसई निकाल शंभर नंबरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 03:30 AM2018-05-27T03:30:07+5:302018-05-27T03:30:07+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता बारावीच्या परीक्षेचा शहरातील बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. अनेक विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामध्ये देशाप्रमाणेच पुण्यातही मुलीच टॉपर ठरल्या आहेत.
पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता बारावीच्या परीक्षेचा शहरातील बहुतांश शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. अनेक विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामध्ये देशाप्रमाणेच पुण्यातही मुलीच टॉपर ठरल्या आहेत.
शहरातील बहुतांश सीबीएसई शाळांचा बारावीचा निकाल दरवर्षी १०० टक्के लागतो. यंदाही ही परंपरा कायम राहिली आहे. आर्मी पब्लिक स्कूलमधील आस्था तिवारी हिन ेह्युमॅनिटी शाखेत ९८.४ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे. विज्ञान शाखेतील अभिनव शंकर व जय कºहाडे यांना ९६.८ टक्के गुण मिळाले असून शाळेत संयुक्तपणे दुसरा क्रमांक पटकावला. यश शर्मा (९६.२ टक्के) तिसरी आली. महंमदवाडी येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये उत्कर्ष सिंघानिया याने ९७.२ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर रेयान खाने हा ९७ टक्के गुण मिळवत कला शाखेत आणि श्रृती निसीथ हि ९६.२ टक्के गुणांसह विज्ञान शाखेत प्रथम आली. खडकी येथील आर्मी पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के निकाल लागला असून मनवी पांडे ही कला शाखेत ९६.४ टक्क्यांसह तर अरूनिमा बंडोपाध्याय ही ९६.२ टक्क्यांसह प्रथम आली.
कोंढवा येथील मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूलमध्ये विज्ञान शाखेतील अश्विन शेणई हा ९६.६ टक्के गुणांसह पहिला आला. आगम जैन व आयुष जैन यांना अनुक्रमे ९५.८ टक्के व ९१.६ टक्के गुण मिळाले. तर सात्विक बन्सल याने ९०.६ टक्के गुणांसह वाणिज्य शाखेत पहिला क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के तर विज्ञान शाखेचा ९९ टक्के निकाल लागला आहे, अशी माहिती प्राचार्या प्रज्ञा गोखले यांनी दिली.
जेएसपीएमच्या ताथवडे येथील ब्लॉसम पब्लिक स्कूलचा निकालही १०० टक्के लागला आहे. एकूण ८९ विद्यार्थ्यांपैकी १५ जणांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. पूर्वा मोघेकर हिने ९५.४ टक्के गुणांसह प्रथम तर अधिराज रस्तोगी याने ९५ टक्के गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला. अमिता सरोया, श्रेयसी स्वामी व रोनक खंडेलवाल हे ९४.८ टक्के गुण मिळवत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. वाघोली येथील दि लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये विज्ञान शाखेतील सिद्धार्थ रघुवंशी याने ९४.६ टक्के गुणांसह तर वाणिज्य शाखेत रिया झा हिने ९२.२ टक्क्यांसह प्रथम क्रमांक पटकावला. ११ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले.
ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल
१. जुईली पटवर्धन - ९५ टक्के
२. आयुषी कश्यप - ९२.८ टक्के
३. गीता गायकवाड -९० टक्के
४. समिधा गंग - ८९.६ टक्के
५. आकाश नाईक - ८९.४ टक्के
६. आयुष बात्रा - ८९.२ टक्के
डीएव्ही पब्लिक स्कूल, औंध
१. इशिता बहादूर - ९७.२ टक्के
२. ग्रिष्मा कुलकर्णी - ९७ टक्के
३. इशा तोडकर - ९६.२ टक्के
४. आदर्श वेमाली - ९६.२ टक्के
५. पिया बर्वे - ९६.२ टक्के
६. तुलिका सोमानी - ९६ टक्के
गोयल गंगा इंटरनॅशनल
स्कूल (१०० टक्के)
१. सांची थवान - ९५.४ टक्के
२. मानसी गुप्ता - ९५ टक्के
३. अक्षय मेनन - ९४.२ टक्के
४. आरूषी दरड व रजत दुबे - ९२.८ टक्के
५. अनिकेत कुमार व गौरी मेनन - ९१.४ टक्के
६. चिराग वोहरा - ९१.२ टक्के
७. रिषभ गोयल - ९०.२ टक्के
संस्कृती प्रशाला, भूगाव (१०० टक्के)
१. आदर्श निन्गानूर -
९४ टक्के
२. रुची लाटकर -
९२.८ टक्के
३. जोत्स्ना बन्सल - ९२.४ टक्के