सीबीएसई ‘नीट’परीक्षा केंद्रातील प्रवेश यंदाही ‘कडक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 08:37 PM2018-04-19T20:37:30+5:302018-04-19T21:00:24+5:30

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत ‘नीट’ ही परीक्षा दि. ६ मे रोजी घेतली जाणार असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मंगळवारपासून प्रवेश पत्र मिळण्यास सुरूवात झाली आहे. या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात येण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.

CBSE's 'neet' entrance examination is 'hard' | सीबीएसई ‘नीट’परीक्षा केंद्रातील प्रवेश यंदाही ‘कडक’

सीबीएसई ‘नीट’परीक्षा केंद्रातील प्रवेश यंदाही ‘कडक’

Next
ठळक मुद्दे‘सीबीएसई’ मागील वर्षीपासून परीक्षा केंद्रांवर प्रवेशासाठी ड्रेस कोडसह विविध नियम नियमावलीचे पालन न केल्यास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही

पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’च्या परीक्षा केंद्रात जाण्यासाठी यंदाही कडक नियमावली करण्यात आली आहे. ड्रेस कोडसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तु, दागिने तसेच इतर साहित्य केंद्रात घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व परीक्षा केंद्र ‘नो टॉलरन्स झोन’ असतील, असे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया प्रवेश पत्रावर स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत ‘नीट’ ही परीक्षा दि. ६ मे रोजी घेतली जाणार असून या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मंगळवारपासून प्रवेश पत्र मिळण्यास सुरूवात झाली आहे. या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात येण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. ‘सीबीएसई’ मागील वर्षीपासून परीक्षा केंद्रांवर प्रवेशासाठी ड्रेस कोडसह विविध नियम बनविले होते. त्यावेळी त्यावर टीकाही झाली. पण यंदाही ही नियमावली कायम ठेवण्यात आली आहे. या नियमावलीचे पालन न केल्यास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ड्रेस कोड आणि इतर बंदी घातलेल्या वस्तुंसाठी सर्व परीक्षा केंद्र ‘नो टॉलरन्स झोन’ म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. सुचनेनुसार आवश्यक साहित्य असल्यासच प्रवेश केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश पत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र याशिवाय कोणत्याही वस्तु परीक्षा केंद्रात आणता येणार नाहीत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरच पेन दिला जाईल. तसेच प्रवेशासाठीची गर्दी टाळण्यासाठी ७.३० ते ८.३० आणि ८.३० ते ९.३० अशा दोन वेळा देण्यात आल्या असून या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे.
-------------------
परीक्षेसाठीचा ड्रेसकोड
- फिकट रंगाचे अर्ध्या बाह्याचे कपडे घालून यावे
- कपड्यांवर मोठ्या आकाराची बटन्स, बॅज किंवा दागिने असू नयेत.
- मुलींनी कपड्यांवर फुलांचे आकार, नक्षीकाम असलेले कपडे घालु नयेत.
- चालीरितीनुसार कपडे घालणाºया विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक तास आधी यावेळी लागेल. 
- स्लीपर, कमी उंचीचे सँडल्स घालावेत, बुट घालता येणार नाहीत.
..............परीक्षा केंद्रात बंदी असलेल्या वस्तु
- कोणत्याही प्रकारचा कागद, पेन्सिल बॉक्स, प्लॅस्टिक पाऊच
- सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य
- बेल्ट, हॅन्डबॅग, पाकीट, गॉगल्स
- अंगठी, माळ यांसह सर्व प्रकारचे दागिने
- घड्याळ, ब्रेसलेट, कॅमेरा
- पाण्याची बाटली, खाण्याचे पदार्थ
- कोणत्याही प्रकारच्या धातुच्या वस्तु

 
 

Web Title: CBSE's 'neet' entrance examination is 'hard'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.