सीसीटीव्ही कॅमे-याची नजर : डीजेला बंदी; साडेआठ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 02:25 AM2017-09-04T02:25:30+5:302017-09-04T02:25:48+5:30

शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडलेल्या गणेशोत्सवाची सांगता आता नजिक आली असून विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे.

CCTV camera eyes: detention of DJ; A total of eight thousand police constables | सीसीटीव्ही कॅमे-याची नजर : डीजेला बंदी; साडेआठ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

सीसीटीव्ही कॅमे-याची नजर : डीजेला बंदी; साडेआठ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Next

पुणे : शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडलेल्या गणेशोत्सवाची सांगता आता नजिक आली असून विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी तब्बल साडेआठ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून सीसीटीव्हीद्वारे बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. मिरवणुकीत डीजेला बंदी घालण्यात आली असून फक्त तीनच पथके लावण्याच्या सूचना मंडळांना देण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली.
मंगळवारी मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होणार आहे. घरगुती गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर नागरिक मानाच्या गणपतीच्या मिरवणुका पाहण्यासाठी बाहेर पडणार आहेत. यासोबतच लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आणि कुमठेकर रस्त्यावरील मिरवणुका पाहण्यासाठी रात्रीही मोठी गर्दी होत असते. संभाव्य गर्दी, घातपाताची शक्यता, महिला सुरक्षा लक्षात घेऊन बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.
स्वत: पोलीस आयुक्त रश्मी शुक्लाया बंदोबस्तामध्ये सहभागी होणार आहेत. सहआयुक्त रवींद्र कदम, चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, १६ उपायुक्त, ३३ सहायक आयुक्त, २०४ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि सात हजार ८७० पोलीस शिपाई बंदोबस्तासाठी तैनात करण्यात
येणार आहेत.
वाहतूकीसाठी स्वतंत्र व्यवस्था
वाहतूक शाखेच्यावतीने वाहतूक नियोजनासाठी वेगळा बंदोबस्त देण्यात आला आहे. उपायुक्त अशोक मोराळे, सहायक आयुक्त राजेंद्र भामरे,
महादेव गावडे, देविदास पाटील, वर्षा गायकवाड यांच्यासह १०४ अधिकारी व १ हजार ३९६ पोलीस बंदोबस्तामध्ये असणार आहेत. वाहतूक पोलिसांना ५०० स्वयंसेवक बंदोबस्तामध्ये मदत करणार असल्याचे मोराळे यांनी सांगितले.

Web Title: CCTV camera eyes: detention of DJ; A total of eight thousand police constables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.