सीसीटीव्हीचे सुरक्षाकवच की दिखावा?

By admin | Published: July 8, 2015 02:50 AM2015-07-08T02:50:38+5:302015-07-08T02:50:38+5:30

रस्त्यावरच्या वाहतुकीपासून ते इमारतींच्या सुरक्षाव्यवस्थेपर्यंत सध्या सीसीटीव्हींचा बोलबोला असला तरी त्याची प्रत्यक्ष उपयुक्तता किती? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे

CCTV security cover? | सीसीटीव्हीचे सुरक्षाकवच की दिखावा?

सीसीटीव्हीचे सुरक्षाकवच की दिखावा?

Next

पराग पोतदार पुणे
रस्त्यावरच्या वाहतुकीपासून ते इमारतींच्या सुरक्षाव्यवस्थेपर्यंत सध्या सीसीटीव्हींचा बोलबोला असला तरी त्याची प्रत्यक्ष उपयुक्तता किती? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सीसीटीव्हीबाबतची तांत्रिक माहिती व गुणवत्तेचा आग्रह नसेल तर सीसीटीव्ही हे सुरक्षाकवच न ठरता तो नुसताच दिखावा ठरण्याचीच शक्यता जास्त आहे.
नुकतेच सिंहगड रस्त्यावर झालेल्या वाहन जाळण्याच्या प्रकारात संबंधित आरोपी सीसीटीव्हीत कैद झाली खरा परंतु त्याचे चित्र
धूसर असल्याने आरोपी स्पष्ट दिसलाच नाही. अखेर त्याच्या धूसर वर्णनावरून रेखाचित्र बनवून पोलिसांना शोध घ्यावा लागला. असेच प्रकार शहराच्या अनेक भागांमध्ये जेव्हा घटना उघडकीस येतात तेव्हा दिसून येते की कॅमेऱ्यातील चित्रच स्पष्ट नसते.
संपूर्णत: सीसीटीव्हीवर अवलंबून राहता येत नाही अथवा रेकॉर्डिंग हवे त्या वेळचे मिळत नाही अगर मिळाले तरी त्याची स्पष्टता चांगली नसते. असे वारंवार दिसून येते.
शहरात अनेक ठिकाणी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्डिंगची सुविधा नीट अपडेट न केल्याने, चांगल्या दर्जाचा डीव्हीआर रेकॉर्डर न घेतल्याने वा उत्तम दर्जाचे कॅमेरे न घेतल्याने अनेक ठिकाणी केवळ सीसीटीव्ही बसवण्याचा सोपस्कारच पूर्ण झाल्याचे दिसून येते.

Web Title: CCTV security cover?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.