कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्ही वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 04:34 AM2018-12-11T04:34:30+5:302018-12-11T04:35:06+5:30
शहरात स्वच्छ भारत अभियानामुळे विविध पातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. रस्त्यावर थुंकणे, पाळीव प्राण्याने रस्त्यावर घाण करणे, फुटपाथवर घाण, कचरा टाकणाºयांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
पुणे : शहरात स्वच्छ भारत अभियानामुळे विविध पातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. रस्त्यावर थुंकणे, पाळीव प्राण्याने रस्त्यावर घाण करणे, फुटपाथवर घाण, कचरा टाकणाºयांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. आता शहराच्या विविध भागांत रस्त्यावर कचरा टाकणाºयांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये शहरातील अशा प्रकारची रस्त्यांवर कचरा टाकायची ४२७ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, तेथे सीसीटीव्ही वॉच ठेवण्यात येणार आहे.
सध्या शहरामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. गेल्या महिन्यापासून शहर स्वच्छ करण्यासाठी व पुण्याला या सर्वेक्षणात थ्री स्टार मिळण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून रस्त्यावर कचरा टाकणाºयांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामध्ये शहरात महापालिकेच्या वतीने घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. परंतु कचरा गोळा करणाºया सेवकांना दरमहा ५० ते ६० रुपये द्यावे लागतात म्हणून अनेक लोक कचरा रस्त्यावर टाकतात. तर शहरात प्रामुख्याने उपनगरांमध्ये शहराच्या हद्दीबाहेरील लोक कामासाठी शहरात येतात. हा कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये शिवणे, चंदननगर, खराडी, वारजे, सिंहगड रोड, आंबेगाव, आदी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
सध्या शहरात रस्त्यावर कचरा टाकत असलेले ४२७ स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी व रात्रीच्या वेळी महापालिकेचे कर्मचारीदेखील या भागात गस्त घालणार आहेत.
रस्त्यावर कचरा टाकणाºयांवर आॅन दि स्पॉट २०० रुपये दंड करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.