कचरा फेकणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 11:44 PM2019-01-06T23:44:26+5:302019-01-06T23:44:29+5:30

आळंदी स्वच्छ सर्वेक्षणाची जोरदार तयारी : नागरिकांच्या प्रतिसादाला महत्त्व

CCTV Watch Now to the Trashmen | कचरा फेकणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीचा वॉच

कचरा फेकणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीचा वॉच

Next

आळंदी : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मधील निर्धारित लक्ष्य साधता न आलेल्या आळंदी नगर परिषदेने यावर्षीचे स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मधील स्पर्धेत अव्वल स्थान घेण्याचा संकल्प करण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. राज्यात पहिल्या १० नगर परिषदांत येण्यासाठी नगर परिषदेची जोरदार तयारी सुरू आहे. सुरुवातीला स्वच्छतेसाठी बोलक्या भिंती हा उपक्रम हाती घेण्यात आला. मात्र, या पुढे आता कचरा फेकणाºयांवर थेट सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. जागोजागी सीसीटीव्ही बसविण्यात येत असून, सार्वजनिक कचरा फेकणाºयांना दंड ठोठावला जाणार आहे.

स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९मधील स्पर्धेसाठी आळंदी नगर परिषदेची जय्यत तयारी सुरू आहे. आळंदीला जोडणाºया रस्त्यांच्या दुतर्फा आळंदीलगतच्या ग्रामपंचायतीमधील कचरा आळंदीलगत आणून टाकला जात असल्याने याचा थेट परिणाम आळंदीचे सर्वेक्षणात होण्याची शक्यता आहे. यामुळे आळंदीलगतच्या गावांमध्येदेखील जनजागृती होण्याची आवश्यकता उघड झाली आहे. यासाठी केळगाव आणि चºहोली खुर्द या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महसूल विभाग व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यात संवाद घडण्याची आवश्यकता आहे. केळगाव आळंदी रस्ता, आळंदी चाकण रस्ता, वडगाव आळंदी रस्ता, मरकळ आळंदी रस्ता, भागिरथी नाला, इंद्रायणी नदीलगतचा नदीकिनारे रस्ता, कुबेर गंगा ओढा दुतर्फा असलेला कचरा प्रभावी स्वच्छता मोहीम राबवून बाहेर काढण्याची गरज आहे. आळंदीला एस.टी.पी. प्रकल्प कार्यान्वित नसल्याने आळंदीलगतची महापालिका म्हणून पिंपरी चिंचवडचा प्रकल्प दर्शविण्यात आला आहे. त्याप्रमाणे तळेगाव,चाकण परिसर व आळंदी नगर परिषदेने पुढील यंत्रणा विकसित करण्याची गरज आहे. आळंदी शहर परिसरात कचरा टाकणाºयांवर लक्ष ठेवण्यासाठी शहरात जागोजाठी सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी भूमकर यांनी यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास नागरिकांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बोलक्या भिंती, जनजागृतीचे फलक, कचराकुंड्यामुक्त परिसर, घंटागाड्या, डस्टबिनचे वाटप, स्वच्छतेस प्राधान्य, आळंदी देवस्थानचे स्वच्छतेस साथ अशा उपाययोजना सुरु आहेत.

प्रशासनाला हवी नागरिकांची साथ
आळंदीतील काही ठिकाणची स्वच्छता वाढली असली तरी ती कायम टिकविण्यास प्रशासनास साथ देण्याची आवश्यकता कामगार वर्गातून व्यक्त होत आहे.
परिषदेने आता काही ठिकाणच्या कचरा टाकण्याच्या जागांच्या परिसरात कचरा टाकणाºयांवर कारवाई करण्यास मदत होण्यासाठी सीसीटीव्ही बसविल्याने नागरिकांमध्ये दंडात्मक कारवाईच्या भीतीने धाक निर्माण होईल.
यामुळे शहर स्वच्छतेच्या मोहिमेला अधिक बळकटी येईल, असा प्रशासनाचा दावा आहे.

आळंदी नगर परिषदेने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºयांवर कारवाईसाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले आहे. यात प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांचे कडेला, इंद्रायणी नदी घाट परिसर, आळंदी मरकळ रस्ता, प्रदक्षिणा मार्ग, चावडी चौक, शाळा क्रमांक २, चाकण चौक, वडगाव चौक आदी ठिकाणांचा समावेश आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरु आहे. आवश्यक त्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.

आळंदी नगर परिषदेचा पहिल्या १० नगर परिषदांत मानांकन व अव्वल क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न आहे. या संकल्पास नागरिकांनी साथ दिल्यास संकल्प सिद्धीने तीर्थक्षेत्र आळंदीच्या नावलौकिकात निश्चित भर पडेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. आळंदीच्या वैभवात वाढ करण्यासाठी नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१९मध्ये सहभागी होऊन अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: CCTV Watch Now to the Trashmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे