निमसाखर गावावर राहणार आता सीसीटीव्हीचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:29 AM2018-12-21T01:29:58+5:302018-12-21T01:30:16+5:30
११ कॅमेरे बसविले : चोरी, टवाळखोरीला बसणार आळा
निमसाखर : येथील ग्रामपंचायतीने ग्रामनिधीच्या पैशातून बसस्थानक, बाजारतळ व सातलिंब परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यामुळे गावामध्ये वाढलेल्या चोऱ्यांचे प्रमाण, टवाळखोरी, छेडछाड व मद्यपींचा वाढलेला उच्छाद यासारख्या प्रकारांना आळा बसणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
युवासेना जिल्हा उपप्रमुख सुदर्शन रणवरे यांनी चौकात सीसीटीव्ही बसविण्यासाठी नुकतेच काही दिवसांपूर्वीच उपोषण केले होते. त्याची दखल घेत तसेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निमसाखर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ग्रामनिधीतून सुमारे नव्वद हजार रुपये खर्च करून अत्यंत वर्दळीचा भाग म्हणून ओळख असलेल्या बसस्थानक परिसरात चार कॅमेरे, बाजारतळावर एक कॅमेरा व सातलिंब येथे चार कॅमेरे तसेच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दोन, असे ११ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे या परिसरात मारामाºया, छेडछाडीसह अन्य प्रकारांवर आळा बसण्यास मदत मिळणार असल्याचे कानगुडे यांनी
सांगितले.
सीसीटीव्हीची निगराणी
सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने परिसरात घडणाºया घटनांवर मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवता येणार असून, चोºया, टवाळखोरी, छेडछाड, दारू पिऊन धिंगाणा घालणे यासह दुचाकीवरून तिघे तिघे जाणे, अस्ताव्यस्तपणे गाड्या पळविणे या सारख्या घटनांना मोठ्या प्रमाणात लगाम लागणार आहे. यामुळे दिवसेंदिवस बसस्थानक परिसरात वाढलेल्या मारामाºया आणी टगेगिरी याही गोष्टीला आळा बसणार आहे.