आंबेगावात अक्षय तृतीया व रमजान साधेपणाने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:11 AM2021-05-18T04:11:45+5:302021-05-18T04:11:45+5:30
अवसरी खुर्द येथील लहान मुले आलंतमश शकील आत्तार, अहमद रजा अमर मणियार, शाद जुबेर मणियार या लहान मुलांनी संपूर्ण ...
अवसरी खुर्द येथील लहान मुले आलंतमश शकील आत्तार, अहमद रजा अमर मणियार, शाद जुबेर मणियार या लहान मुलांनी संपूर्ण रमजान महिन्यात उपवास केल्याने त्यांचा सत्कार पंचायत समितीचे उपसभापती संतोष भोर यांनी केला.
अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, निरगुडसर, पारगाव येथील मुस्लिम बांधव दर वर्षी रमजान ईद निमित्त नमाज ईदगाह मैदानावर पठणासाठी एकत्रित येत असतात. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत मुस्लिम समाज बांधवांनी रमजान ईदनिमित्त घरीच नमाज पठण केले. तसेच रमजान ईद व अक्षय तृतीय हे हिंदू मुस्लिम बांधवांचे सण एकाच दिवशी आल्याने गुलाब पुष्प देवून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
अवसरी खुर्द येथिल लहान मुले आलंतमश शकील आत्तार, अहेमद रजा अमर मणियार, शाद जुबेर मणियार यांनी महिन्याचा कडक उपवास केल्याबद्दल त्यांचा सत्कार पंचायत समितीचे उपसभापती संतोष भोर, सरपंच जगदीश अभंग, दिनेश खेडकर, अनिल शिंदे यांनी केला.
--