नीरा येथे आषाढी एकादशी अत्यंत साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:59+5:302021-07-21T04:09:59+5:30
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील श्री विठ्ठलमंदिरात दरवर्षी आषाढी एकादशी अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. संत सोपानकाका पालखी सोहळयात याच ...
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील श्री विठ्ठलमंदिरात दरवर्षी आषाढी एकादशी अत्यंत उत्साहात साजरी केली जाते.
संत सोपानकाका पालखी सोहळयात याच मंदिरात दुपारचा विसावा घेतला जातो. तसेच माऊलींच्या परतीच्या प्रवासात त्यांचा दुपारचा विसावाही याच मंदिरात असतो. त्यामटळे या मंदिरातील आषाढी यात्रेला यात्रेला मोठे महत्त्व असते.
या मंदिरत एकादशीला भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करीत असतात. मात्र कोरोनामुळे मागीलवर्षी आणि या वर्षी सुद्धा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
मंगळवार दि. २० रोजी पहाटे साडे चार वाजता श्री व सौ आदेश गिरमे तसेच श्री व सौ मधुकर माने यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मीनीची महापूजा करण्यात आली. पौराहित्य सचिन गोडके व सहकार्य दिलीप साळुंखे (गुरव) यांनी केले. पहाटे साडेचार ते सकाळी सहा पर्यंत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत काकडा करण्यात आला.
यावेळी ह.भ.प.सुभाष महाराज जाधव, मदन चव्हाण, प्रभुदयाळ अग्रवाल, विठ्ठल झांबरे, संतोष गांधी, प्रमोद गवळी आदी उपस्थित होते.