शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात

By Admin | Published: February 20, 2017 02:40 AM2017-02-20T02:40:05+5:302017-02-20T02:40:19+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांत छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. या वेळी विविध

Celebrate the birth anniversary of Shivaji Maharaj | शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात

शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात

googlenewsNext


पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांत छत्रपती शिवाजीमहाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. या वेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. काही ठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.
रुपीनगर येथील नवमहाराष्ट्र विद्यामंदिर येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवरायांचे पराक्रम, हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आढावा आपल्या भाषणातून मांडला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद गौड उपस्थित होते. मोशीतील आदर्शनगर येथील यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित यशस्वी प्राथमिक माध्यमिक इंग्लिश मीडिअम विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आदर्शनगर, संघर्ष चौक, मोरया चौक, शिक्षक कॉलनी, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर, खानदेशनगर आदी परिसरात रॅली काढण्यात आली. सदाफ शेख, सिद्धार्थ कोरे, शुभम मोरे, सूरज
पारखे, करण बिक, शरीफ शेख, यश हंडाळ यांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या.
रुपीनगर, सहयोगनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर -महात्मा फुले ट्रस्टच्या ज्ञानप्रभात विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे यांनी शिवरायांचे कार्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल गवळी, सुमन गवळी, बाळासाहेब सावंत, मुख्याध्यापक राहुल गवळी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Celebrate the birth anniversary of Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.