सण-उत्सव साधेपणाने साजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:46+5:302021-09-05T04:14:46+5:30

बारामतीतील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा बारामती: कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुढे येणारे सण, उत्सव समारंभ साधेपणाने गर्दी न ...

Celebrate the festival with simplicity | सण-उत्सव साधेपणाने साजरे

सण-उत्सव साधेपणाने साजरे

googlenewsNext

बारामतीतील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

बारामती: कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुढे येणारे सण, उत्सव समारंभ साधेपणाने गर्दी न करता साजरे करावेत, तसेच कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाय-योजनांमध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. तसेच, बारामती परिसरात सुरू असणारी विकासकामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बारामती परिसरातील विकासकामांच्या पाहणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सण-समारंभ गर्दी न करता साजरे करावेत. कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांमध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून बारामती शहरात तसेच ग्रामीण भागात सोयी-सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. सामाजिक दायित्वातून क्रांतिदेवी बजात ट्रस्टने पुणे जिल्ह्यासाठी दीड लाख लस दिली हे काम खरोखरच कौतुकस्पद आहे. स्वयंसेवा संस्थांचे अशा प्रकारचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कन्हेरी येथील फळरोपवाटिका व वन उद्यान, देसाई इस्टेट आणि क्रीडा संकुल येथील कॅनलवरील सुशोभीकरण इत्यादी कामांची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना दिल्या. सर्वच विभागांनी विकासकामे समन्वयाने पार पाडावीत. निधीचा पुरेपूर वापर करावा. विकासकामे दर्जेदार झाली पाहिजेत. निधीची मागणी असल्यास प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, परिवहन आयुक्त कार्यालयातून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामतीसाठी मिळालेल्या नवीन इंटरसेप्टर वाहनाचे पूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशाेर पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, मोटार वाहन निरीक्षक चंद्रमोहन साळोखे व नंदकिशोर काळे व इतर अधिकारी उपस्थित होते. या वाहनामध्ये स्पीड गन, ब्रिथ ॲनालायझर व टिल्ट मीटर बसविले आहेत. त्यामुळे रोडवरील जादा स्पीडची वाहने तसेच नशा करुन चालवणारी वाहने पकडण्यास मदत होणार आहे.

कन्हेरी येथील वनविभागाच्या वतीने सुरू असलेल्या चिंकारा पार्कच्या कामाची पहाणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.

०४०९२०२१-बारामती-१०

Web Title: Celebrate the festival with simplicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.