कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा : कचरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:16 AM2021-09-05T04:16:30+5:302021-09-05T04:16:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मार्गासनी : वेल्ह्यात कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मार्गासनी : वेल्ह्यात कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले.
वेल्हे येथे तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व तालुक्यातील पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक घेण्यात आले. त्यवेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई मोरे पाटील पोलीस महाराष्ट्र राज्य पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष दादा काळभोर पुणे जिल्हा अध्यक्ष गाळे तहसीलदार शिवाजी शिंदे साहेब पोलीस निरीक्षक मनोज पवार माजी पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष भिकोबा रणखांबे वेल्हे तालुका अध्यक्ष बाळासाहेब रसाळ आदी सर्व पोलीस पाटील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच उपस्थित होते.
कचरे म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांनी साध्या पद्धतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावयाचा आहे. तहसीलदार शिवाजी शिंदे म्हणाले की, मतदार नोंदणीसाठी तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांनी जनजागृती करावी तसेच मंडळाच्या ठिकाणी नोंदणीचे फॉर्म उपलब्ध करून नवीन मतदारांची नोंदणी करावी व गणपतीचे देखावे मतदार नोंदणीच्या अनुषंगाने करावेत. पोलीस निरीक्षक मनोज पवार म्हणाले की, सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत केवळ एकाच स्पीकरला परवानगी असेल सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना गणपतीची मूर्ती उंची फक्त चार फूट असेल व घरगुती गणपतीची उंची दोन फूट असेल तसेच गणेशाचे आगमन आणि विसर्जनाच्यावेळी कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका करता येणार नाहीत. जे गणपती उत्सव मंडळ नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती यावेळी पवार यांनी दिली.
--
०४मार्गसनी गणेशमंडळ बैठक
फोटो ओळी : वेल्हे येथे गणेशोत्सवाच्याबाबत आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील.