नीरेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:18 AM2021-08-17T04:18:16+5:302021-08-17T04:18:16+5:30
नीरा : ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण सरपंच तेजश्री विराज काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपसरपंच राजेश काकडे, माजी ...
नीरा : ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण सरपंच तेजश्री विराज काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपसरपंच राजेश काकडे, माजी उपसभापती रक्षनाथ माने, सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष वसंत दगडे, ग्रामसेवक मनोज डेरे, यांच्यासह ग्रा.पं.सदस्य, ज्येष्ठ नागरिक, पोलिस कर्मचारी, ग्रामस्थ, ग्रा.पं.कर्मचारी उपस्थित होते.
नीरा पोलिस दूरक्षेत्रामध्ये ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ननवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी दहावीच्या परीक्षेत ९५.६० टक्के गुण मिळवून महात्मा गांधी विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या माजिद समीर तांबोळी या विद्यार्थ्याचा फौजदार कैलास गोतपागर यांनी सत्कार केला. तांबोळी याला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतही देण्यात आली. या वेळी सहा. फौजदार सुरेश गायकवाड, पोलीस नाईक राजेंद्र भापकर, हरिश्चंद्र करे, पोलीस शिपाई नीलेश जाधव, प्रशांत रासकर, विनायक हाके, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, पोलीस मित्र रामचंद्र कर्नवर उपस्थित होते. महात्मा गांधी विद्यालयात प्राचार्य गोरखनाथ थिटे, सौ. लीलावती रिखवलाल कन्या विद्यालयात प्राचार्या सुरेखा बोडरे, जि. प. प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. त्याचप्रमाणे अहिल्यादेवी चौकात जागृती संघटनेचे माजी सैनिक सतीश कुंजीर वतीने, बुवासाहेब चौकात माजी सैनिक संघटनेच्या ध्वजाचे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद काकडे वतीने तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इमारतीवर विकास अधिकारी मयूर भुजबळ, प्रमोद साबळे यांनी ध्वजारोहण केले.
--
फोटो क्रमांक: १६ नीरा झेंडा वंदन
फोटोओळ : (१) नीरा पोलीस दूरक्षेत्रात ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ननवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करताना.
(२) नीरा ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणानंतर सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे यांसह ग्रामपंचायतीचे सदस्य, कर्मचारी.