कोरोनाच्या संकटामुळे शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करा : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:12 AM2021-02-11T04:12:04+5:302021-02-11T04:12:04+5:30

शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्सव- २०२१ साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नर पंचायत समिती येथील ...

Celebrate Shiva Jayanti with simplicity due to corona crisis: Collector | कोरोनाच्या संकटामुळे शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करा : जिल्हाधिकारी

कोरोनाच्या संकटामुळे शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करा : जिल्हाधिकारी

Next

शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर शिवजयंती उत्सव- २०२१ साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जुन्नर पंचायत समिती येथील जिजामाता सभागृहात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, नगराध्यक्ष श्याम पांडे, पंचायत समिती सभापती विशाल तांबे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपवनसंरक्षक जयरामे गौडा, उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी सारंग कोडलकर, तहसीलदार हनुमंत कोळेकर, केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहायक बाबासाहेब जंगले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी तसेच विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवप्रेमी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, यापूर्वी नियोजन बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने केलेल्या सूचना विचारात घेऊन राज्य शासनाकडे शिवजयंती साजरी करण्याबाबत

प्रस्ताव सादर केलेला आहे. राज्य शासनाकडून शिवजयंती साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आल्यानंतर त्यानुसार नियोजन करण्यात येईल. कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. शिवजयंती साजरी करणे आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. शिवजयंती साजरी करताना सर्वांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले. विद्युत व्यवस्था, गडावर करण्यात येणारी रोषणाई, स्वच्छतागृहांची सुविधा, अग्निशमन दल, पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, हेलीपॅडची व्यवस्था इत्यादी संदर्भात नियोजन करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी शिवभक्तांनी शिवज्योत गडावर घेऊन जाऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.

आमदार अतुल बेनके शिवजयंती महोत्सव साजरे करनेसाठी प्रशासनास आवश्यक सूचना केल्या.

जुन्नर पंचायत समिती येथील जिजामाता सभागृहात शिवजयंती नियोजन बैठकीचे मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख.

Web Title: Celebrate Shiva Jayanti with simplicity due to corona crisis: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.