शिवसृष्टीसाठी महामेट्रोलाच साकडे
By admin | Published: April 2, 2017 03:05 AM2017-04-02T03:05:57+5:302017-04-02T03:05:57+5:30
मेट्रो प्रकल्पाच्या जागेत येत असलेल्या शिवसृष्टी उभारणीबाबत महापालिका प्रशासन दाखवीत असलेल्या उदासीनतेला कंटाळून कोथरूडमधील नगरसेवकांनी
पुणे : मेट्रो प्रकल्पाच्या जागेत येत असलेल्या शिवसृष्टी उभारणीबाबत महापालिका प्रशासन दाखवीत असलेल्या उदासीनतेला कंटाळून कोथरूडमधील नगरसेवकांनी आता थेट महामेट्रो कंपनीलाच साकडे घातले आहे. मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी निवेदन पाठवले असून, त्यात मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.
कोथरूडमध्ये याआधी शिवसृष्टी उभारण्याची योजना होती. त्यासाठी गेली अनेक वर्षे अंदाजपत्रकात तरतूदही केली जात आहे. नगरसेवक दीपक मानकर, पृथ्वीराज सुतार, किशोर शिंदे त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत होते. नेमकी तीच सुमारे १८ एकर जागा महामेट्रो कंपनीला मेट्रो रेलसाठी हवी
आहे.
तिथे त्यांना मेट्रोचे स्थानक करायचे आहे. त्या वेळी कोथरूडमधील नगरसेवकांनी शिवसृष्टीही उभारावी व मेट्रो स्टेशनही करावे, अशी भूमिका घेतली. मात्र, महामेट्रो कंपनीने ते शक्य नसल्याचे कळविले. त्यामुळे शिवसृष्टीचा विषय मागे पडला. जागा मोठी आहे, त्यातील काही भाग शिवसृष्टीसाठी व उर्वरित भाग मेट्रो स्टेशनसाठी वापरणे शक्य आहे, असा प्रस्ताव नंतर सर्व नगरसेवकांनी दिला; पण त्याकडेही महापालिका प्रशासनाने
कधीही गंभीरपणे पाहिले नाही.
(प्रतिनिधी)