पारंपरिक उत्साहात वटपौर्णिमा साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:09 AM2021-06-25T04:09:18+5:302021-06-25T04:09:18+5:30
अनेकींनी वडाच्या झाडाचे चित्र रेखाटून, तुळशीला प्रतीक मानून आणि छोटी वडाची फांदी त्यात रोवून वटपौर्णिमा साजरी केली. काही सोसायट्यांमध्ये ...
अनेकींनी वडाच्या झाडाचे चित्र रेखाटून, तुळशीला प्रतीक मानून आणि छोटी वडाची फांदी त्यात रोवून वटपौर्णिमा साजरी केली. काही सोसायट्यांमध्ये वडाचे रोप किंवा फांदी कुंडीत लावून सर्व महिला पूजेसाठी एकत्र आल्या होत्या. सोशल मीडियावर अनेकींनी पूजा करतानाचे फोटो पोस्ट केल्याचे पहायला मिळाले.
सावित्रीचा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला. सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत आणले, अशी आख्यायिका सांगितली जाते. या संकेताला अनुसरून महिला यादिवशी वडाचीच पूजा करतात. त्यासाठी त्या वटवृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन वडाच्या मुळाशी पाणी घालतात आणि त्याला प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टण करतात. नंतर त्याच्या मुळाशी असलेल्या ब्रह्मदेव, सत्यवान सावित्री, धर्मराज व नारद यांच्या प्रतिमांचे पूजन करतात व प्रार्थना करतात. पूजेनंतर सुवासिनींनी एकमेकींना सौभाग्यवाण दिले.